उद्धव ठाकरेंनी टाकला मोठा डाव; राठोडांना करणार चितपट?

Uddhav Thackeray| BJP| हा भाजपसाठी मोठा धक्का असेल.
Uddhav Thackeray|
Uddhav Thackeray|

Uddhav Thackeray| यवतमाळ : शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackceray) यांनी एक प्लॅन आखल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री संजय राठोड यांच्या मतदार संघातील माजी राज्यमंत्री, भाजप नेते, दिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख उद्या करणार ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. या अगोदर संजय राठोड यांचे निकटवर्तीय असलेले महंत यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला होता. हा भाजपसाठी मोठा धक्का असेल.

विशेष म्हणजे माजी आमदार संजय देशमुख यवतमाळ येथील असंख्य कार्यकर्त्यांसह देशमुख शिवसेनेते पक्ष प्रवेश करणार आहेत. गेल्या महिन्यात शिवसैनिकांच्या मेळाव्यासाठी खासदार अरविंद सावंत अकोल्यात गेले होते. त्यावेळी या दोघांची गुप्त भेट झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर सेना भवनात भेट घेऊन पक्ष प्रवेशाबदल चर्चा केली होती. शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संजय देशमुख हाती शिवबंधन बांधणार आहेत.

दिग्रसच्या राजकारणात संजय राठोड आणि संजय देशमुख महत्वाचे नेते आहेत. संजय देशमुखांना मात दिल्यानंतर आता संजय राठोड यांचे दिग्रस मतदारसंघात वर्चस्व आहे. दोघांचीही सुरुवात शिवसेनेतून झाली. दोघेही जिल्हाप्रमुख होते. पण कालांतराने पक्षाने संजय राठोड यांना झुकते माप दिल्यानंतर संजय देशमुख अपक्ष लढले.

आमदार संजय राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश केल्या आता दिग्रसमध्ये त्यांना मात देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पुन्हा संजय देशमुख यांना पुढे आणण्याचा निर्णय घेतला आहे. अकोल्यात अरविंद सावंत यांना भेटण्यापूर्वी त्यांनी मुंबईत 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर अखेर संजय देशमुख उद्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com