Kedar : लोकशाहीचे चारही स्तंभ अधिकाराचा वापर करताना कर्तव्यांचे पालन करतात का?

लोकशाहीचे चारही स्तंभ अधिकाराचा वापर करत असता कर्तव्याचे पालन करतात की नाही, हा प्रश्‍न पडला आहे. याचे उत्तर शोधण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे आमदार केदार (MLA Sunil Kedar) म्हणाले.
Sunil Kedar
Sunil KedarSarkarnama

नागपूर : कर्तृत्ववान सरपंच आणि नगरसेवक, ज्यांनी आपआपल्या कामाचा ठसा समाजमनावर उमटवला आहे, अशा सर्वांचा सत्कार करण्याचा सोहळा आयोजित केला आहे. या लोकांनी स्वकर्तृत्वावर राजकारण, समाजकारण करीत असताना कर्तव्य आणि कृती या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत आपली कारकीर्द फुलविली आहे. खरोखरच ही मंडळी या सन्मानाची हकदार आहे, असे राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री आमदार सुनील केदार म्हणाले.

सकाळ वृत्तपत्र समूहाने नागपुरात (Nagpur) नुकत्याच आयोजित केलेल्या सरपंच (Sarpanch) आणि नगरसेवकांच्या (Corporator) सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार केदार (MLA Sunil Kedar) बोलत होते. या लोकांनी केलेला संघर्ष, प्रवास आणि रचलेल्या यशोगाथा यांतून येणार पिढी नक्कीच प्रेरणा घेणार आहेत आणि तुमच्याही पुढे जाण्यासाठी तुमच्यासोबत स्पर्धा करतील. त्यांनी तसे केलेच पाहिजे. कारण निकोप स्पर्धा जेवढी जास्त होईल, तेवढेच जास्तीत जास्त काम या समाजासाठी होणार आहे. यामुळे तुमच्या कर्तृत्वाला अधिक झळाळी मिळणार आहे.

आज आम्ही नेते जिंदाबाद, मुर्दाबादचे नारे देत मोर्चे, आंदोलने करीत असतात आणि याची दखल त्यांच्या वरिष्ठांनी घ्यावी, अशी त्यांची अपेक्षा असते. कारण आम्हाला राजकारणात पुढे जायचे असते. पण स्वातंत्र्याची लढाई लढताना कुणाच्या मनात नव्हतेच की देश स्वतंत्र झाल्यानंतर मी मंत्री होणार, मी आमदार होणार, खासदार होणार, अधिकारी होणार, मी वर्तमानपत्र चालवणार. कारण ते लोक निःस्वार्थ भावनेने लढले. सर्वांची एकच भावना होती की, देश स्वतंत्र झाला पाहिजे. आज समाजाला नेमकी त्याच भावनेची गरज आहे. निःस्वार्थ भावनेने लढणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे.

स्वतंत्र भारतात आपण आज अधिकाराने राहतो. आपले अधिकार गाजवतो, पण अधिकाराला कर्तव्याची जोड देतो का, हा प्रश्‍न स्वतःला विचारला पाहिजे. अधिकारच गाजवत राहिलो आणि कर्तव्य जर मागे पडलं, तर समतोल बिघडेल. ह बिघडलेला समतोल १३० कोटी जनतेला परवडणारा आहे का, हा मूलभूत प्रश्‍न आहे. सर्व जाती, धर्म, पंथांच्या लोकांना एकत्र घेऊन घटनेने मिळालेली लोकशाही घेऊन आपण मार्गक्रमण करतो आहोत. पण लोकशाहीचे चारही स्तंभ अधिकाराचा वापर करत असता कर्तव्याचे पालन करतात की नाही, हा प्रश्‍न पडला आहे. याचे उत्तर शोधण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे आमदार केदार म्हणाले.

Sunil Kedar
Video: आमच्या लोकांना सांभाळण्यात उणिवा राहिल्या; सुनील केदार

मी ग्रामीण भागातला व्यक्ती आहे आणि ग्रामीणचे प्रतिनिधित्व करतो. शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकरी कुटुंबातील आहे आणि आम्हा शेतकऱ्यांमध्ये एक गोष्ट पूर्णपणे रुजलेली आहे, एक तत्व आम्हाला माहिती आहे, ते म्हणजे पेराल ते उगवेल. ज्वारी पेरली तर ज्वारीच उगवणार, गहू कधीच उगवणार नाही. राजकारण आणि समाजकारणात काम करताना याच तत्वावर काम केले पाहिजे. येथे जमलेले कर्तृत्ववान सरपंच आणि नगरसेवक अगदी तसेच काम करत आहेत आणि भविष्यातही करत राहतील, यात तिळमात्र शंका नाही, असे आमदार केदार यांनी सांगितले.

माझी पहिली निवडणूक जिल्हा परिषदेची मी लढलो १९९३ मध्ये. तेव्हापासून जगन्नाथाचा रथ ओढण्याचे काम सुरूच आहे. वर्तमान पत्रांबद्दल बोलायचे झाले तर गेल्या १० वर्षामध्ये ट्रेंड बदलत चालला आहे. वर्तमानपत्रसुद्धा सामाजिक कार्यामध्ये दमदार वाटचाल करीत आहे आणि त्यामध्ये ‘सकाळ’ अग्रक्रमावर आहे. आज देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष आपण साजरे करीत आहोत. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तेव्हा आपले देशवासी निःस्वार्थ भावनेने लढाई लढले. त्यांच्यामुळेच आपण आज स्वातंत्र्याची चव चाखतो आहोत. हे सर्व घडले त्यांच्या निःस्वार्थ भावनेने लढलेल्या लढ्यामुळे, असे केदार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com