भाजप पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने बदलणार वर्धा जिल्ह्याचे राजकारण…

जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पक्षाचे प्रदेश संघटक सचिव अभिजित फाळके यांच्या पुढाकाराने काल वर्धा जिल्ह्यातील इतर पक्षांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश घेतला.
Jayant Patil NCP
Jayant Patil NCPSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी संवाद यात्रेची सुरुवात विदर्भातून केली होती. गडचिरोली जिल्ह्यातून यात्रेची सुरुवात करीत त्यांनी अख्खा विदर्भ तेव्हा पिंजून काढला होता. त्यांच्या संवाद यात्रेचा परिणाम आजही बघायला मिळत आहेत. वर्धा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षासह इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काल मुंबईत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश घेतला.

जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पक्षाचे प्रदेश संघटक सचिव अभिजित फाळके यांच्या पुढाकाराने काल वर्धा (Wardha) जिल्ह्यातील इतर पक्षांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश घेतला. वर्धा जिल्ह्यातील पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आजचा पक्ष प्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. वर्धा जिल्ह्यात ज्यांना जनाधार आहे, त्यांना संधी देण्याची शरद पवारांची आणि पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे नव्या जुन्या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे पक्ष संघटना बळकटीसाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी भवन मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक रुपचंद टोपले, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे माजी विदर्भ अध्यक्ष महेश मुडे, भाजप व्यापारी आघाडी वर्धाचे जिल्हाध्यक्ष राकेश मंशानी, आरपीआयचे जिल्हा महासचिव कैलास सेलकर, बसपाचे माजी विधानसभा अध्यक्ष नागसेन थूल तसेच इतर असंख्य पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार जयदेव गायकवाड, आदिवासी सेल विभागाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार राजू तोडसाम, प्रदेश उपाध्यक्ष दिवाकर गमे, सांगली शहराध्यक्ष संजय बजाज तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Jayant Patil NCP
जयंत पाटील हसत हसत म्हणाले, प्रॉब्लेम नाही; आमच्याकडे सर्वच जण येतात...

काल झालेल्या या पक्षप्रवेशामुळे वर्धा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. यापुढील काळ म्हणजे निवडणुकांचा हंगाम असणार आहे. सर्वच राजकीय पक्ष फोडाफोडीचे राजकारण करण्यात गुंतले आहेत. २०२४ मध्ये महाराष्ट्रात सत्ता मिळवायची असेल तर त्याचा मार्ग विदर्भातून जातो, हे एव्हाना प्रमुख राजकीय पक्षांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे विदर्भात आपल्या पक्षाला बळकटी कशी देता येईल, यादृष्टीने सर्व जण कामाला लागले आहेत. सध्यातरी यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com