यशोमती ठाकुरांचे वर्चस्व असलेल्या बॅंकेवर अध्यक्ष भारसाकळे तर उपाध्यक्षपदी साबळे...

या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना Congress, NCP, BJP and Shivsena मिळून सहकार पॅनल उभे ठाकले होते. तर दुसरीकडे परिवर्तन पॅनलमध्येही भाजप वगळता इतर तिन्ही पक्षांचे प्रतिनिधित्व होते.
Victory on Amravati District Central Co Operative Bank
Victory on Amravati District Central Co Operative BankSarkarnama

अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाराव्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता आज बँकेच्या सभागृहात निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये सहकार पॅनलचे सुधाकर नारायणराव भारसाकळे हे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी सुरेश बापूरावजी साबळे विजयी झालेत. निवडणूक बिनविरोध होईल, असे वाटत असतानाच परिवर्तन पॅनलचे बच्चू कडू आणि इतरांना नामांकन दाखल केल्याने निवडणूक घ्यावी लागली.

२१ सदस्यीय संचालक मंडळातील चार जागा अविरोध निवडल्या गेल्या. गेल्या ४ ऑक्टोबरला १७ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. सहकार पॅनलने तब्बल १२ जागा जिंकल्या. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले तर उर्वरित चार जागा परिवर्तन पॅनलने जिंकल्या. अविरोध विजयी झालेल्यांमध्ये दोन्ही पॅनलचा प्रत्येकी एक संचालक असून उर्वरित दोन संचालक तटस्थ होते. सहकार क्षेत्राची निवडणूक असल्याने या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना मिळून सहकार पॅनल उभे ठाकले होते. तर दुसरीकडे परिवर्तन पॅनलमध्येही भाजप वगळता इतर तिन्ही पक्षांचे प्रतिनिधित्व होते.

दुसरीकडे भाजपच्या जिल्हाध्यक्ष मात्र या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढल्या होत्या. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीची बैठक जिल्हा बँकेच्या सभागृहात आज दुपारी १२ वाजता पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली. पहिली पाच मिनिटे उमेदवारी दाखल करण्यासाठीची होती. त्यानंतर छाननी, माघार आणि आवश्यकता भासल्यास मतदान असे बैठकीचे वेळापत्रक होते. ही निवडणूक जवळपास बिनविरोध होईल, असे जवळपास स्पष्ट झाले असताना राज्यमंत्री असलेले परिवर्तन पॅनलचे बच्चू कडू, अजय मेहकरे, चित्रा डहाणे, आनंद काळे व जयप्रकाश पटेल यांच्यावतीने अध्यक्षपदासाठी जयप्रकाश पटेल व उपाध्यक्ष पदाकरिता आनंद काळे यांनी नामांकन दाखल केले. त्यामुळे मतदान घेण्यात आले.

सहकार पॅनलच्या उमेदवाराला १५ तर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारास ६ मते मिळाली. यानंतर पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी अध्यक्षपदासाठी सुधाकर नारायणराव भारसाकळे व उपाध्यक्ष पदासाठी सुरेश बापूरावजी साबळे हे विजयी झाल्याची घोषणा केली. सुरुवातीपासूनच अत्यंत अटीतटीची ही निवडणूक झाली. सहकार पॅनलचे अध्यक्ष व उपाध्यक्ष विजयी होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

निवडणुकीदरम्यान अनेक आक्षेप सहकार पॅनलवर लावण्यात आले होते. मात्र विरोधकांच्या हाती काही लागले नाही. बँकेचे सभासद, शेतकरी हे सहकार पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले व विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली असल्याची प्रतिक्रिया बबलू देशमुख यांनी यावेळी दिली.

Victory on Amravati District Central Co Operative Bank
बच्चू कडू, आंबेडकरांची भेट: राज्यात नवीन समिकरण जुळणार?

बँकेवर जे आरोप विरोधकांनी केले, ते सर्व बिनबुडाचे आहेत. येत्या काही दिवसांतच तुम्हाला दूध का दूध पानी का पानी पाहायला मिळणार आहे. त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. सहकार पॅनल नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे पॅनल आहे. यापुढेही आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करत राहू व बँकेला अजून उंच शिखरावर नेऊ, असे नवनिर्वाचित अध्यक्ष सुधाकर भारसाकळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com