भाजपच्या दोन गटांतील वाद विकोपाला, परस्परांविरोधात गुन्हे दाखल...

भंडारा (Bhandara) जिल्हा परिषदेत काँग्रेसने भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्याशी हातमिळवणी करून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद मिळावीत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली.
Charan Waghmare Bhandara
Charan Waghmare BhandaraSarkarnama

भंडारा : भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा भाजपच्या दोन गटातील वाद आता विकोपाला गेला असून भाजप व फुटीर भाजप गट यांनी एकमेकांविरुद्ध भंडारा पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हे नोंदविले आहेत. यामुळे चरण वाघमारे यांच्या फुटीर गटातील जिल्हा परिषद उपाध्यक्षासह तिघांवर ॲट्रॉसीटी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मूळ भाजप गटावर मारहाणी चे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

भंडारा (Bhandara) जिल्हा परिषदेत (ZP) काँग्रेसने (Congress) भाजपचे (BJP) माजी आमदार चरण वाघमारे यांच्याशी हातमिळवणी करून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद मिळावीत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. नाना पटोले यांना पर्यायाने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसून भाजपचे आमदार परिणय फुके व खासदार सुनील मेंढे यांच्या गटाला हाताशी धरून सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना संख्याबळ जुळवता आले नाही. भाजपचे दोन गटांत वाटल्या गेल्याने वादाची ठिणगी तिथेच पडली.

१० मे रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सभागृहात पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संदीप कदम हजर होते. भाजपच्या दोन गटांत सभागृहातच वाद निर्माण झाला. यानंतर दोन्ही गट एकमेकांवर भिडल्याने सदस्यांमध्ये हाणामारी झाली अन् प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी महिला सदस्याच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष संदीप ताले यांच्यासह तिघांविरुद्ध विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

Charan Waghmare Bhandara
भंडारा-गोंदिया झेडपी सत्तास्थापनेचे पडसाद नागपूर महानगरपालिकेवर उमटणार!

तक्रारीवरून उपाध्यक्ष संदीप ताले, सभापती नंदू रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांच्या विरोधात कलम 354, 354 (अ), 294,323, 34 भादंवि सहकलम 3 (1) (आर) (एस) 3 (2) (डब्ल्यू) (1) (2)3(2) (विए) अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, संदीप ताले यांच्या तक्रारीवरून भाजपच्या दुसऱ्या गटातील विनोद बांते, प्रियांक बोरकर, गणेश बोरकर, माहेश्वरी नेवारे या चौघांविरुद्ध भंडारा पोलिसांत 294, 323, 506 कलम 34 भादंवि नुसार गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com