अकोल्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयावर नाराज, शिंदे गटात सामील !

उद्या या संदर्भात अकोल्यात शिवसेनेची (Shivsena) बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
Uddhav Thackeray Shivsena
Uddhav Thackeray ShivsenaSarkarnama

नागपूर : शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विल्पव बाजोरिया हे आज शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झाले आहे. त्यांच्यासोबत युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप, आश्विन नवले, शशी चोपडे यांच्यासह आदी कार्यकर्ते त्यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती आहे.

विल्पव बाजोरिया हे शिवसेनेचे (Shivsena) आमदार आहेत, अन् गोपीकिशन बाजोरिया यांचे ते पुत्र आहेत. दरम्यान, उद्या दुपारी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्यासह आदी कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती आहे. उद्या या संदर्भात अकोल्यात (Akola) शिवसेनेची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. असे शिवसेनेचे पदाधिकारी संतोष अनासने यांनी सांगितले.

वादाला देशमुखांच्या दगाफटक्यांची किनार..

शिवसेनेचे अकोल्याचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी अनेकदा विद्यमान शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बाळापूर मतदारसंघाचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्यावर आरोप केले होते. अकोल्यात शिवसेना संपवण्यासाठी देशमुख हे भाजपला नेहमीचं मदत करतात, याबाबत अनेक तक्रारी पक्ष प्रमुखांकडे केल्या. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याचे त्यांनी म्हटलं होतं. अकोला शिवसेनेतील वादाला विधान परिषद निवडणुकीतील पक्षाच्या लाजिरवाण्या पराभवाची किनार आहे, आमदार नितीन देशमुखांच्या दगाफटक्यांनीच तीनदा आमदार राहिलेल्या गोपीकिशन बाजोरियांचा पराभव झाल्याचा बाजोरिया गटाचा आरोप होता.

आमदार देशमुखांवर गंभीर आरोप..

आमदार देशमुख (MLA Nitin Deshmukh) भाजपशी संधान साधत जिल्ह्यात शिवसेना पक्ष‍ संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा बाजोरिया गटाचा आरोप होता. माजी सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पत्र दिलं होतं. यात हे आरोप करण्यात आले होते. अन् या पत्रात थेट पक्षाचे आमदार आणि माजी जिल्हाप्रमुख नितीन देशमुखांवर गंभीर आरोप लावले होते. पत्रात पिंजरकरांनी आमदार देशमुखांवर गंभीर आरोप लावले होते. मात्र, आमदार नितीन देशमुखांनी सहसंपर्क प्रमुखांचे आरोप फेटाळून लावले होते.

Uddhav Thackeray Shivsena
अकोला जिल्ह्यातून मंत्रिपदाची लॉटरी कुणाला? सावरकर, बच्चू कडू यांना संधी मिळणार?

या कारणामुळे होते ठाकरेंवर नाराज..

अकोल्यातील शिवसेनेतील हे आरोप-प्रत्यारोप फार गंभीर होते. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या. विशेष बाब म्हणजे थेट शिवसेना पक्षप्रमुखांना पत्र लिहून आमदार नितीन देशमुखांवर गंभीर आरोप करणारे श्रीरंग पिंजरकर यांना सहसंपर्क प्रमुख पदावरून हटवले होते. यामुळेच तेव्हापासून बाजोरिया गटांमध्ये पक्ष प्रमुख ठाकरेंवर नाराजी असल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in