मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस-नाना पटोले यांच्यात बंद दाराआड खलबतं; चर्चांना उधाण

या भेटीवेळी दोघांनीही अधिकारी, कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांना चेंबरच्या बाहेर ठेवले होते.
Devendra Fadnavis-Nana Patole
Devendra Fadnavis-Nana PatoleSarkarnama

भंडारा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची सोमवारी (ता. ३ ऑक्टोबर) भेट भंडाऱ्यात झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाजाआड काही मिनिटे खलबतं झाल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे. विशेषतः काँग्रेस नेत्याने फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत. (Discussions between Devendra Fadnavis and Nana Patole behind closed doors)

भंडाऱ्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी भंडारा जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही या बैठकीस आले होते. मात्र, त्यांना बैठकीला येण्यास थोडासा उशीर झाला. पटोले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. त्याला उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिली.

Devendra Fadnavis-Nana Patole
Andheri By-Election ...तर अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला मिळेल : उज्ज्वल निकम

फडणवीस हे बैठकीनंतर पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, मधल्या कालावधीत फडणवीस आणि पटोले यांच्यामध्ये अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये काही मिनिटांची भेट झाली. या भेटीवेळी दोघांनीही अधिकारी, कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांना चेंबरच्या बाहेर ठेवले होते. या दोघांमध्येच चेंबरमध्ये खलबतं झाली. मात्र, त्याचा तपशील मिळू शकलेला नाही. मात्र, भंडाऱ्यातील स्थानिक प्रश्नासंदर्भात बैठक झाली असावी, असा एक कयास काढण्यात येत आहे.

Devendra Fadnavis-Nana Patole
आमदारकीच्या यादीतून नाव वगळलं तर मी राज्यपालांवर केस करेन : आनंद शिंदे भडकले

दरम्यान, भारतीय जनता पक्षातून बाहेर पडल्यापासून नाना पटोले हे कायम फडणवीस आणि भाजपवर टीकास्त्र सोडत आलेले आहेत. पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही कायम हल्लाबोल केला आहे, त्यामुळे या भेटीबाबत उत्सुकता वाढला आहे. दोन्ही पक्षाच्या कट्टर नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असावी, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यामुळे या भेटीची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com