कॉंग्रेसचे काही आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा अन् वडेट्टीवार कॅबिनेटमध्ये !

कोण अशा चर्चा करतंय आणि कोण त्याला हवा देऊन अफवा पसरवतं, काही कळत नाही’, असे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह काल गुजरातेतील सुरतमध्ये होते, अन् तेथून आज आसाममधील गुवाहाटीमध्ये दाखल झाले. कॉंग्रेसचे ९ आमदार त्यांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा पसरली आहे आणि यामध्ये राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे नाव जोडण्यात येत आहे.

या चर्चेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्याशी संपर्क केला असता, ते मुंबईत (Mumbai) कॅबिनेटमध्ये बसून होते. ‘कोण अशा चर्चा करतंय आणि कोण त्याला हवा देऊन अफवा पसरवतं, काही कळत नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) परवा रात्री बंड पुकारल्यापासून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातही नवनवीन अफवांना पेव फुटले आहे. अशातच मंत्री विजय वडेट्टीवार कॉंग्रेसच्या ९ आमदारांना घेऊन नॉट रिचेबल झाल्याचे बोलले जात होते.

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता भाजपही अलर्ट मोडवर आली आहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परदेश दौऱ्यावर जाऊ नका, पुढचे दोन-तीन दिवस संपर्कात राहा, बोलावण्यात आलं तर तातडीने मुंबईत दाखल व्हा,असे आदेश भाजपने आमदारांना दिले आहेत. दरम्यान भाजपचे नागपुरातील काही आमदार आज मुंबईला रवाना झाल्याचीही माहिती आहे. आता पुढे काय होणार, याची उत्सुकता राज्यातील प्रत्येकाला लागलेली आहे.

Vijay Wadettiwar
दहा तासांत एकनाथ शिंदे अनेकदा रश्मी ठाकरेंशी बोलले!

एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे. आपल्यासोबत अपक्षांसह शिवसेनेचे 46 आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाण्याचे ठरवले असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या काही आमदारांच्या नाराजीचा फायदा उचलून भाजपने ठाकरे सरकारला खिंडीत गाठले आहे. अशा राजकीय परिस्थितीत काहीही होऊ शकते. त्यामुळे आता कोण, कुठे, केव्हा आणि कसा जाईल, हे सांगणे अवघड होऊन बसले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com