Gulabrao Patil - Nana Patole यांच्यात चर्चा; अजितदादाही गालातल्या गालात हसले; नेमक काय घडलं?

Nana Patole and Gulabrao Patil : गप्पा मारतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला
Nana Patole and Gulabrao Patil
Nana Patole and Gulabrao Patil Sarkarnama

सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून हे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहे. असे असतानाच आज मात्र विधिमंडळ परिसरात एक वेगळ चित्र दिसून आले. दररोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) व काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे विधिमंडळाबाहेर गप्पा मारताना दिसून आले. त्यांचा गप्पा मारतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे.

गुलाबराव पाटील आणि नाना पटोले हे विधिमंडळाबाहेर गप्पा मारत असताना त्यांच्या बाजूने विरोधी पक्षनेते अजित पवार, हसन मुश्रीफ, किरण लहामटे, धनंजय मुंडे हे जाताना दिसून आले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांना हात जोडून नमस्कार केला. तर अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील गालातल्या गालात हसत गुलाबराव पाटील यांना नमस्कार केला. यावेळी तेथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही हा प्रसंग पाहत विधिमंडळात निघून गेले.

Nana Patole and Gulabrao Patil
Pandharpur Urban Bank Election : भाजपच्या प्रशांत परिचारकांनी केला मनसे नेत्याचा करेक्ट कार्यक्रम...

दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि नाना पटोले या दोघांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली. मात्र दोघांमध्ये नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली हे समजू शकले नाही. तर आता गुलाबराव पाटील आणि नाना पटोले नेमकं काय चर्चा करत असतील? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्या हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत असून आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अविश्वासचा प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in