Nagpur News : गाणारांचा जिवात जीव : 'नॉट रिचेबल' भाजप आमदार अखेर 'रिचेबल'; म्हणाले...

Nagpur News : गाणार यांच्या विजयासाठी भाजपच्या (BJP) सहाही जिल्ह्यातील आमदारांना कामास लावण्यात आले आहे.
Sameer Kunawar, Nago Ganar
Sameer Kunawar, Nago GanarSarkarnama

Nagpur Teachers Constituency Election : नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी उद्या सोमवारी मतदान होणार आहे. अशातच शिक्षक परिषदेचे उमेदवार व भाजपचे उमेदवार नागो गाणार यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली होती. भाजप आमदार समीर कुणावार 'अदृश्य' असल्याची चर्चा होती. मात्र, याबाबत कुणावर यांनीच स्पष्टीकर दिले आहे.

गाणार यांच्या विजयासाठी भाजपच्या (BJP) सहाही जिल्ह्यातील आमदारांना कामास लावण्यात आले आहे. हिंगणघाटमध्ये समीर कुणावार यांच्यावर जबाबदारी असताना ते शनिवारी सायंकाळपासून दिसेनासे झाले होते, अशी चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे गाणार समर्थकांचे टेन्शन वाढले होते. मात्र, 'सरकारनामा'ने कुणावर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Sameer Kunawar, Nago Ganar
Amar Mulchandani News : ईडीच्या कामात अडथळा आणणाऱ्या मुलचंदांनी कुटुंबाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

कुणावर म्हणाले, मी सुरुवातीपासून गाणार यांचे काम केले आहे. आमचे सर्व कार्यकर्ते त्यांचे काम करत आहेत. मी सकाळपासून अनेक लोकांशी फोनवरुन बोलतो आहे. १५ दिवसांपासून आमचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी झटत आहेत. गाणार यांचे काम चांगले आहे. कोणतेही मतभेत नाहीत. मी स्वत: शिक्षकांशी बोललो आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यामुळे ते नॉट रिचेबल असलेल्या चर्चांणवर पडदा पडला.

Sameer Kunawar, Nago Ganar
Amravati News : मतदानाच्या एक दिवस आधी उडाली खळबळ : काँग्रस उमेदवाराची क्लिप व्हायरल...

पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह ते बाहेरगावी गेल्याची चर्चा होती. तसेच ते गाणार यांच्यावर नाराज आहेत, असेही बोलले जात होते. मात्र, यावर त्यांनी स्पष्टीकरण देत आपण गाणार यांचे काम करत असल्याचे सांगितले आहे. मात्र, आमदार समीर कुणावार हे नाराज असल्याची चर्चा कुणी सुरु केली. यावरुन भाजपमध्येच गट असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com