Digras APMC Results : राठोडांच्याच मतदारसंघात देशमुखांनी उडवला त्यांचा धुव्वा, पुढील कारकिर्दीसाठी दिला इशारा !

Sanjay Rathod : पालकमंत्री संजय राठोड यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.
Sanjay Deshmukh at Digras
Sanjay Deshmukh at DigrasSarkarnama

Yavatmal District's Digras APMC Election Result News : कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस ही जिल्ह्यात प्रतिष्ठेची असून यंदाची ही निवडणूक मोठी अटीतटीची झाली. त्यामुळे निवडणूक माजी मंत्री संजय देशमुख व विद्यमान मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. काल (ता. २८ एप्रिल) झालेल्या निवडणुकीत संजय देशमुख यांच्या पॅनलने १८ पैकी १४ जागांवर विजय मिळवत पालकमंत्री संजय राठोड यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला. (Guardian Minister Sanjay Rathod's panel was blown away)

दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रसच्या १८ संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतरची मतमोजणी काल सायंकाळी उशिरापर्यंत येथील दिनबाई विद्यालयातील मतदान केंद्रावर पार पडली. या निवडणुकीमध्ये एका अपक्ष उमेदवारासह शेतकरी परिवर्तन महाविकास आघाडीचे १८ उमेदवार तर पालकमंत्री संजय राठोड यांच्या शेतकरी विकास आघाडीचे १८ उमेदवार अशा एकूण ३७ उमेदवारांमध्ये थेट लढत झाली.

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया ४ मतदान केंद्रांवर घेण्यात आली. बाजार समितीच्या १८ संचालकांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण सहकारी मतदार संघातून निवडून आलेल्या ७ उमेदवारांमध्ये गजानन इंगळे १६७ मतं, भीमराव खारोडे -१६६ मतं, प्रभाकर जाधव - १६५ मतं, सतीश तायडे -१७० मतं, सखाराम तुंडलवार -१६९ मतं, अमित देशमुख -१६१ मतं तर रामेश्वर राऊत हे १६६ मतं घेऊन विजयी झाले.

इतर मागासवर्गीय सहकारी संस्था मतदार संघातून साहेबराव चौधरी यांनी १८२ मतं घेतली. महिला राखीव सहकारी संस्था मतदार संघातून आशा राठोड १७८ मतं व धुरपत राठोड या १७३ मते घेऊन विजयी ठरल्या. वि.जा.भ.ज. सहकारी मतदार संघातून किशोर आडे १८२ मतं घेऊन विजयी झाले. सर्वसाधारण ग्रामपंचायत मतदार संघातून सुरेश इहरे २५३ मतं तर रमेश राठोड २३० मतं घेऊन विजयी झाले.

Sanjay Deshmukh at Digras
Arni APMC Election : आर्णी बाजार समिती निवडणुकीत आमने-सामने उभे ठाकले सख्खे काका-पुतणे...

अनुसूचित जाती जमाती ग्रामपंचायत मतदार संघातून मिलिंद मानकर २३३ मते घेऊन विजयी ठरले. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ग्रामपंचायत मतदार संघातून भूषण जाधव २४२ मतं घेऊन विजयी झाले. यात माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे १४ उमेदवार विजयी झाले तर मंत्री संजय राठोड यांच्या शेतकरी विकास आघाडीचे चार उमेदवार विजयी ठरले. तसेच या निवडणुकीत उभ्या असलेल्या एका अपक्ष उमेदवाराने केवळ एक मत मिळविले, हे विशेष.

या बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी समर्थीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय देशमुखांच्या शेतकरी परिवर्तन विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवल्याने पुन्हा एकदा सहकार क्षेत्रावर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. त्यामुळे निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया संपताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवीत भगवा गुलाल उधळून जल्लोष केला.

Sanjay Deshmukh at Digras
Arni APMC Election : सहकारी संस्थेच्या जागा हडपणारेही उतरले बाजार समितीच्या निवडणुकीत !

राज्यातील (Maharashtra) सत्तासंघर्षानंतर मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे शिंदे गटात गेले होते. त्यानंतर झालेल्या दिग्रस बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC Election) पालकमंत्री संजय राठोड यांना माजी मंत्री संजय देशमुखांनी धूळ चारली आहे. मूळ शिवसेनेशी (Shivsena) फारकत घेऊन शिंदे गटात गेल्यामुळे त्यांना हा धक्का बसला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

विशेष म्हणजे संजय राठोड यांच्या विधानसभा मतदारसंघात पराभवाचा झटका बसणे म्हणजे त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी हा इशारा मानला जात असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याचीही चर्चा बाजार समितीच्या निकालानंतर सुरू झाली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com