Digras APMC Election : शेतकऱ्यांचे हित कागदोपत्रीच, अन् आजी-माजी मंत्री वाटताहेत आश्‍वासनांची खिरापत !

Sanjay Rathod : संजय राठोड आणि माजी मंत्री संजय देशमुख या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली.
Sanjay Rathod and Sanjay Deshmukh
Sanjay Rathod and Sanjay DeshmukhSarkarnama

रामदास पद्मावार

Yavatmal District APMC Election News : दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिंकण्यासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री संजय राठोड आणि माजी मंत्री संजय देशमुख या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत चढली आहे. (Both of them made this election with dignity)

येत्या शुक्रवारी (ता. २८) दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीकरिता मतदान होणार आहे. एकूण १८ उमेदवारांच्या हाती कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार दिला जाणार आहे. पालकमंत्री संजय राठोड हे शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व करीत आहेत. तर माजी आमदार संजय देशमुख शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे नेतृत्व करीत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून संजय देशमुख यांनी या कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्य केले आहे. शेतकऱ्यांचे हित हा शब्द केवळ कागदोपत्रीच राहिला, तर बाजार समितीच्या सभासदांनी इतका स्वार्थ साधला की, यावर न बोललेलेच बरे, त्यामुळेच कसेही करून कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या हातून जाता कामा नये, असा निश्‍चय करून संजय देशमुख व त्यांच्या पॅनलचे उमेदवार चांगलेच धडपड करत आहेत.

पालकमंत्री संजय राठोड यांनी मरगळ आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायापालट करण्याचा निर्धार केला आहे. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर उपाययोजना व बाजार समितीत विविध सोयी उपलब्ध करून देण्यावर भर देणार असल्याचे सांगत या निवडणुकीत राठोडांनी आपल्या पॅनलचा प्रचार चालविला आहे. शेतकरी आणि बाजार समितीचे अतूट असे नाते आहे. बाजार समिती ही एक व्यवस्था असली तरी ती शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण पिकविलेल्या अन्नधान्याला योग्य किंमत देऊन आपले मूल्य जपणारी ही संस्था आहे.

Sanjay Rathod and Sanjay Deshmukh
APMC Election : हुकूमशाहीच्या विरोधात एकवटले शेतकरी, प्रस्थापितांच्या विरोधात थोपटले दंड !

आजपर्यंत शेतकऱ्यांच्या (Farmers) हिताच्या दृष्टीने काहीही ठोस कामे केलेली नसताना आजी - माजी मंत्री आश्‍वासनांची खिरापत वाटण्यात मग्न झालेले आहेत. शेतकरी त्यांच्या विश्‍वास किती ठेवतात, हे लवकरच कळणार आहे. जिल्ह्यातील दोन संजय यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने दोघांमध्ये घमासान होत आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकांपेक्षा या निवडणुकीतली रंगत काही वेगळीच आहे.

आपण बाजार समिती आपण कोणाच्या हातात सोपवतो आणि ती तो कशी चालवतो, याला फार महत्त्व आहे. पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) व माजी मंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वात ही निवडणूक (APMC Election) लढविली जात आहे. त्यामुळे यावेळी चांगलीच रंगत आली आहे. अखेर या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल याकडे जिल्ह्याचे (Yavatmal) लक्ष लागले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in