तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पाहिला का? रडायला लागले होते ते…

आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. ते सोडवण्यासाठी आम्ही काम करतो, असे म्हणत नाना पटोलेंनी (Nana Patole) खासदार बोंडेंच्या वक्तव्याबाबत अधिक बोलण्याचे टाळले.
Nana Patole and Devendra Fadanvis
Nana Patole and Devendra FadanvisSarkarnama

भंडारा : भाजपचे (BJP) खासदार अनिल बोंडे काय बोलतात, त्यांच्या बोलण्यात काही तारतम्य राहत नाही, असा खोचक टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. महाविकास आघाडी सरकार तीन चाकी सरकार होती. समन्वयाचा अभाव असल्यामुळे ही सरकार कोसळल्याचे वक्तव्य खासदार अनिल बोंडे यांनी केले होते. पटोलेंना भंडाऱ्यात त्यांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला.

अनिल बोंडे यांच्या बोलण्यात कधीही तारतम्य नसते. त्यांच्याविषयी काय बोलावे, असा प्रश्‍न करीत आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. ते सोडवण्यासाठी आम्ही काम करतो, असे म्हणत नाना पटोलेंनी (Nana Patole) खासदार बोंडेंच्या (Anil Bonde) वक्तव्याबाबत अधिक बोलण्याचे टाळले. परवा परवा (Congress) कॉंग्रेसच्या प्रदेश समितीवर प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीवरून कॉंग्रेसचा नागपुरातील (Nagpur) एक गट नाराज झाला आहे. ते दिल्लीत (Delhi) जाऊन मधुसूदन मिस्त्री यांची भेट घेऊन पटोलेंची तक्रार करणार असल्याची माहिती आहे.

प्रदेश समितीच्या नियुक्त्यांबाबत विचारले असता, ज्या पक्षात लोकशाही असते, त्या पक्षात या गोष्टी चालत असतात. ज्या पक्षात दबावतंत्र असतं, तेथे असं होत नाही. पण तेथे अजून काही गंभीर गोष्टी घडतात. उपमुख्यमंत्री बनल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा चेहरा बघितला, रडायला लागले होते ते. आमच्या पक्षात पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि खुर्च्या मर्यादित आहेत. टप्प्याटप्प्याने सर्वांना पदे मिळतील. तरीही कुणाला तक्रार करायची असेल, तर तो त्यांचा प्रश्‍न आहे. पण प्रदेश समितीच्या बाबतीत आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाने सर्व आनंदीत आहे, असे पटोले म्हणाले.

Nana Patole and Devendra Fadanvis
थोडे दिवस जाऊ द्यात...मुख्यमंत्र्यांचे डोक ठिकाणावर येईल...नाना पटोले

नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असे असताना गावकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. सतत वाढत्या महागाईचे गाऱ्हाणे लोकांनी त्यांच्या समोर मांडले. खताच्या बॅगची सरकारने किंमत वाढविली आणि आधी ५० किलोची असलेली बॅग आता ४५ किलोची केली, असे लोकांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. प्रचंड राजकीय उलथापालथ सुरू आहे. पण या सर्व गदारोळात कॉंग्रेस मात्र शांत आहे, याबाबत विचारले असता, आम्हाला दुसऱ्यांच्या घरात वाकून बघण्याची सवय नाही. कुणाच्या पक्षात काय सुरू आहे, काय नाही. या भानगडीत पडल्यापेक्षा जनतेच्या प्रश्‍नांना आम्ही अधिक महत्व देतो, असे पटोलेंनी सांगितले.

राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. लगतच्या मध्यप्रदेशासह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातही प्रचंड पाऊस झाला. पण प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आपल्या जिल्ह्यात कुठेही जीवित हानी झाली नाही. यासाठी जिल्हा आणि तालुका प्रशासन कौतुकास पात्र आहे आणि आम्ही खरंच त्यांचे कौतुक करतो. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींना विकत घेण्याची परंपरा सुरू झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अशी भूमिका कधीही मांडली नव्हती. लोकप्रतिनिधी जनतेची कामे करणारे असले पाहिजे. त्यामुळे सर्व राजकीय उलथापालथ बाजूला ठेऊन विदर्भाच्या दौऱ्यावर आलो आले, असे नाना पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com