मला विचारून लफडा केला का तुम्ही?, खासदार नवनीत राणांची ऑडिओ क्लिप व्हायरल...

खासदार (Navnit Rana) या नात्यानं त्यांच्या भागातील कुणी पीडितांनी किंवा महिलांनी त्यांच्याकडून अपेक्षा करू नये का, मग कुणाकडून करावी?
MP Navnit Rana, Amravati.
MP Navnit Rana, Amravati.Sarkarnama

नागपूर : अमरावती (Amravati) लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत रवी राणा (Navnit Rana) या नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहतात. सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधणे असो, किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका असो, त्यांची चर्चा होतेच. गल्लीतील डान्समुळे तर दिल्लीतील संसदेत केलेल्या भाषणामुळेही त्या अनेकदा चर्चेचा विषय बनल्या आहेत. आताही त्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत, ते म्हणजे एक ऑडिओ क्लिप.

युवा स्वाभिमान पार्टीच्या एका पदाधिकाऱ्याने आपली फसवणूक केल्याची तक्रार एका पीडित महिलेने खासदार नवनीत राणा यांच्याकडे केली. त्यासाठी त्यांनी खासदार राणा यांना कॉल करून आपली परिस्थिती सांगितली व पार्टीच्या त्या पदाधिकाऱ्याला समज द्यावी, अशी विनंती केली. मात्र, यावर चिडत खासदार नवनीत राणा यांनी पीडितेची उलट तपासणी सुरू करत, तुम्ही मला विचारून लफडा केला का? असा उलट प्रश्न त्या महिलेला विचारला. नवनीत राणा यांची ही मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. खासदार या नात्यानं त्यांच्या भागातील कुणी पीडितांनी किंवा महिलांनी त्यांच्याकडून अपेक्षा करू नये का, मग कुणाकडून करावी? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जातोय.

खासदार नवनीत राणा यांनी कैफियत ऐकून घेतली नाही म्हणून त्या पिडीत महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तक्रारीची दखल घेत खासदार राणा यांना नोटिस बजावली आहे. या नोटिसमध्ये त्यांना उत्तर मागवण्यात आले आहे. आता हे प्रकरण कोणे वळण घेणार, हे नवनीत राणांच्या उत्तरानंतर कळणार आहे. आपल्या बेधडक आणि रोखठोक वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नवनीत राणा या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

MP Navnit Rana, Amravati.
कार्यकर्त्याच्या पत्नीला नवनीत राणा फाडफाड, अश्लील बोलल्या; महिला आयोगाची नोटीस

राणा दाम्पत्याला कोरोनाची लागण..

दरम्यान, नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. सभा समारंभ व निवडणुकीच्या जल्लोषामुळे संपर्कात आलेल्या कार्यकर्ते व नागरिकांनी आपली खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन राणा दाम्पत्याने केले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात ५२५ नवे कोरोना बाधित रूग्ण असून एकूण रुग्ण संख्या ही २४२४ वर गेली आहे. त्यामुळे सर्वांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com