Eknath Shinde : देवेंद्रजी गाडी चालवत होते, पोटातलं पाणीही हलत नव्हतं…

Samriddhi Highway : समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले त्याचा सार्थ अभिमान आहे.
Devendra Fadanvis and Eknath Shinde
Devendra Fadanvis and Eknath ShindeSarkarnama

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले त्याचा सार्थ अभिमान आहे. आनंद याचाही आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला. त्यामुळे मी या हायवेचे काम करू शकलो. आज आम्ही दोघे एकत्र असताना समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) केंद्रीय मंत्री भारती पवार रावसाहेब दानवे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासह इतर मंत्री व मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, या महामार्गाला आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले, याचा आनंद फार मोठा आहे. आम्हीच काम सुरू केले आणि आमच्याच कारकिर्दीमध्ये लोकार्पण करतोय, ही भाग्याची गोष्ट आहे.

भूमी अधिग्रहणामध्ये अनेकांनी अडचणी आणल्या. पण मोपलवार, गायकवाड, परदेशी आदी सर्व अधिकाऱ्यांच्या साथीने आम्ही त्यावर मात केली. शेतकऱ्यांना विश्‍वास दिला, आरटीजीएसच्या माध्यमातून तात्काळ पैसा त्यांच्या खात्यात जमा केला. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्‍वास आम्ही जिंकला. त्यामुळे पुढचे काम सुरू झाले. हा इको फ्रेंडली रस्ता आहे. ३५ लाख झाडे लावणार आहोत. २५० मेगावॉट सोलर वीज तयार करतोय. १२ तलाव, नद्या, नाल्यांचे खोदकाम केले. ८ ते १० महिन्यांत मुंबईपर्यंत रस्ता पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हायवे नाही गेमचेंजर..

हा हायवे नाही, तर गेमचेंजर आहे. महाराष्ट्राची नवी लाइफलाइन होणार आहे. दोन्ही बाजूंना इंडस्ट्रीज, नगर वसवणार आहोत. लाखो लोकांना रोजगार देणार हायवे म्हणून ओळखला जाणार आहे. देशातील सर्वांत लांब हायवे आहे. आम्ही पाहणी करायला आलेलो असताना देवेंद्र फडणवीसांनी गाडी चालवली, मी बाजूला बसलो होतो. तेव्हा पोटातले पाणीही हलत नव्हते, असा अनुभव मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Devendra Fadanvis and Eknath Shinde
Eknath Shinde : समृद्धी महामार्गाकडे निघालेला मुख्यमंत्र्यांचा ताफा अचानक मागे फिरला, कारण काय?

विकासाची गंगा..

विकासाची गंगा आणणारा हा हायवे आहे. राज्यात १० जिल्ह्यांना थेट जोडतो. २४ जिल्ह्यांना इम्पॅक्ट देणारा हायवे आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदीया, नांदेड, हैद्राबादला कनेक्टीवीटी देणारा हायवे आहे. अवघड आव्हानात्मक काम होते. मोदींच्या आशीर्वादाने आम्ही हे काम करू शकलो. बुलेट ट्रेन ड्रिम प्रोजेक्टलाही आम्ही गती देतो आहे. डबल इंजीन सरकार सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे, हे लोकांना वाटत आहे, ही मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्रात उद्योगधंदे यावेत, हीच आमची इच्छा आहे. आम्ही मेहनत करणारे लोक आहोत, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com