बदल्यांच्या आदेशाला स्थगिती म्हणजे पुन्हा घोटाळा? : फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

अवघ्या १२ तासांच्या आत ५ अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती
CM Uddhav Thackeray Criticise Devendra Fadnavis
CM Uddhav Thackeray Criticise Devendra Fadnavis sarkarnama

नागपूर : राज्याच्या पोलिस खात्यात काल सायंकाळी खांदेपालट करण्यात आली असून एकाच वेळी तब्बल ३३ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र बदल्यांच्या आदेशाला १२ तास उलटत नाही तेच मुंबई आणि ठाण्यातील ५ अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे यावरुन उलट-सुलट चर्चांना उधान आलं आहे. यावर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एका यात बदली घोटाळ्यासारखे प्रकरण आहे का? असा सवाल विचारला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या १२ तासांत रद्द झाल्या. पण या बदल्यांचे आदेश परत घेण्याचं काय कारण आहे, हे समजलं पाहिजे. प्रशासकीय चूक झाली, की मागच्या वेळेस १० अधिकाऱ्यांचे बदली आदेश थांबवले आणि नंतरच्या बदली घोटाळा सीबीआयच्या स्कॅनरमध्ये आहे. बदली घोटाळ्यात ते आलेलं आहे. आताही तसा काही प्रकार आहे का, हे समजलं पाहिजे.

पालकमंत्र्यांना विश्वासात न घेतल्याने दिली स्थगिती?

मुंबई आणि ठाण्यातील बदल्याबाबत सबंधित पालकमंत्र्यांना विश्वासात न घेतल्याने पदोन्नती थांबवण्याची गृहखात्यावर नामुष्की आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. विषेशतः ठाण्यात पदोन्नतीबाबत शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विश्वासात घेतले नसल्याची चर्चा आहे. याआधी अनिल देशमुख गृहमंत्री असताना मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या (DCP) बदल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्या बदल्या स्थगित केल्या होत्या. असाच प्रकार सध्या घडल्याचे बोललं जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com