अजित पवारांच्या भाषणाचा नंबर फडणविसांनी कट केला...

आमदार मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमात देहूच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना तर निमंत्रणच दिलेच नाही आणि प्रोटोकॉल नुसार पालकमंत्र्यांनाही बोलू दिलं नाही.
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama

अकोला : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) किती खालच्या पातळीचे राजकारण करू शकतात, हे आजच्या नरेंद्र मोदी यांच्या देहूच्या दौऱ्यावरून दिसून आले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देहू येथे आले होते. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यावरून आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी हे आरोप केले आहेत.

आमदार मिटकरी म्हणाले, पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यक्रमात देहूच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना तर निमंत्रणच दिलेच नाही आणि प्रोटोकॉल नुसार पालकमंत्र्यांनाही (Guardian Minister) बोलू दिलं नाही. उलट मी मोदींची स्तुती कशी करू शकतो, असा आव आणून देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा देहूसारख्या पवित्र भूमीतही ‘त्यांची’ परंपरा कायम ठेवल्याचा आरोप आमदार मिटकरी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत जाणीवपूर्वक अजित पवार (Ajit Pawar) यांना डावलण्याचे काम फडणवीस आणि त्यांच्या तथाकथित आध्यात्मिक आघाडीने केले आहे, असे आमदार मिटकरी म्हणाले.

या कृत्याचे भविष्यात त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही मिटकरी म्हणाले. त्यामुळे सदर प्रकाराबद्दल नरेंद्र मोदी यांनी तमाम महाराष्ट्राची आणि वारकऱ्यांची माफी मागावी. कारण देहू हे एक आध्यात्मिक पीठ आहे. त्याला राजकीय आखाडा करू नका. अन्यथा तुकाराम महाराजांच्या अभंगातील काठी भारतीय जनता पार्टीचे टाळके शेकल्याशिवाय राहणार नाही, असेही आमदार मिटकरी यांनी नमूद केले.

Amol Mitkari
Video : अमोल मिटकरी यांच्या तोंडी हनुमान चालीसा : राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

मावळचे खासदार श्रीरंग बारणे, स्थानिक आमदार सुनील शेळके यांना तर निमंत्रणच दिले नाही. स्थानिक पालकमंत्र्यांनी बोललं पाहिजे, हा एक प्रोटोकॉल आहे. पण उसनं अवसान आणून मी नरेंद्र मोदींची कशी स्तुती करू शकतो आणि त्यांना कसे खूश करू शकतो, असा आव आणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा देहू सारख्या पवित्र भूमितदेखील राजकारण करण्याचे काम केले. मोदींच्या आजच्या कार्यक्रमात जाणीवपूर्वक डावलण्याचं काम फडणवीसांनी आज केलं आहे. याचे परिणाम भविष्यात ते भोगतील. पण पंतप्रधान मोदींनीही या प्रकाराची माफी मागावी, अशी मागणी आमदार मिटकरी यांनी केली आहे. आज झालेल्या प्रकाराच्या मागे केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांचाच मेंदू आहे, असा आरोपही आमदार अमोल मिटकरी यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com