Devendra Fadnavis Nagpur Flood : नागपूर पूरग्रस्त भागाची फडणवीसांची पाहणी; नागरिकांनी व्यक्त केला रोष !

Devendra Fadnavis Meet Nagpur : सरकारकडून मदतीच्या काही घोषणा करण्यात आल्या आहेत.
Devendra Fadnavis Nagpur Flood :
Devendra Fadnavis Nagpur Flood : Sarkarnama

ारNagpur : राज्यात सध्या विविध ठिकाणी मुसळधार पावसाने थैमान मांडलंय. काही भागात तर सरासरीची पातळी ओलांडून अधिकचा पाऊस पडत आहे. रस्त्यांवर पाणीच पाणी वाहत आहे. यामध्ये राज्याची उपराजधानी नागपुरात तर धो-धो पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागपूर शहराला पुराने वेढले आहे. नागपूरच्या दुकानांमध्ये-घरादारात पाणी शिरलं आहे. यामुळे मोठे नुकसान घडून आले आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis Nagpur Flood :
Marathwada Politics : धनंजय मुंडेंच्या धडाक्याने भाजप गार ! पालकमंत्रीपद नकोरे बाबा

घरादारात पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोजच्या वापरातील वस्तू, कपडे, अन्नधान्याचे नुकसान झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पुरामुळे नागपूरकर चिंताग्रस्त झालेले आहेत. मोठे नुकसान झाल्यामुळे आता नागपूरला उपमुख्यमंत्री पोहाेचले असून, पूरग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत. मात्र, या वेळी काही नागरिकांनी फडणवीस यांच्यावर रोष व्यक्त केला. (Devendra Fadnavis inspects Nagpur flood affected area)

Devendra Fadnavis Nagpur Flood :
Nagaland NCP MLA Meet Mumbai : नागालँडमधील राष्ट्रवादीचे आमदार मुंबईत येणार; पण कारण काय ?

राज्य सरकारकडून याबाबत काही उपाययोजनांची आखणी करण्यात येत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमध्ये महापालिकेत बैठक पार पडली आहे. यामध्ये सरकारकडून मदतीच्या काही घोषणा करण्यात आल्या आहेत. नागपूरमधील पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच ज्या दुकानांचं नुकसान झाले आहे, त्यांना 50 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com