देवेंद्र फडणवीस १० दिवसांपूर्वीच म्हणाले होते की, हा पत्त्यांचा बंगला...!

कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), संजय राठोड आणि संतोष बांगर शिंदेंच्या (Eknath Shinde) गळाला लागण्यापूर्वीच त्यांना वर्षा बंगल्यावर नेण्यात आल्याची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस १० दिवसांपूर्वीच म्हणाले होते की, हा पत्त्यांचा बंगला...!
Devendra Fadnavis on Eknath Shinde, Devendra Fadnavis NewsSarkarnama

नागपूर : राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन सुरतेत दाखल झाल्यानंतर राज्यात आणि देशात वेगवान घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात भूकंप आणला आहे. या भूकंपानंतर राज्यातील अनेक बड्या नेत्यांचे नियोजित दौरे, कार्यक्रम रद्द झाले आहेत. (Devendra Fadnavis on Eknath Shinde)

तिकडे मुंबईत शिवसेनेने (Shivsena) आपल्या सर्व आमदारांना (उर्वरित) मुंबईत पाचारण केले आहे. आता राहिलेल्या आमदारांना सांभाळण्याची खबरदारी घेताना शिवसेना तारेवरची कसरत करताना दिसत आहे. कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), संजय राठोड आणि संतोष बांगर शिंदेंच्या (Eknath Shinde) गळाला लागण्यापूर्वीच त्यांना वर्षा बंगल्यावर नेण्यात आल्याची माहिती आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी काल नागपुरात (Nagpur) दाखल झाले होते, ते सुद्धा आज सकाळी तातडीने मुंबईला गेले. त्यांनीही मुंबई आपले सर्व मंत्री, आमदार आणि महत्वाच्या नेत्यांच्या बैठक बोलावली आहे. आपले काही आमदार शिंदेंसोबत गेले का, याची चाचपणी तेथे केली जाणार असल्याची माहिती आहे. (Eknath Shinde News)

भाजप नेते वारंवार सांगत होते की, आम्ही हे तीन चाकांची रीक्शा असलेले सरकार पाडू. त्यांनी वेळोवेळी तारखाही जाहीर केल्या होत्या. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांच्या हातात हात घट्ट पकडून ठेवले होते. येथे महाविकास आघाडीत तर फूट पडली नाही, पण सत्तेतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे. एकनाथ शिंदे एक मोठा गट घेऊन सुरतेत दाखल झाले आहे. त्यांनी शिवसेनेसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. पण त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात येते.

Devendra Fadnavis on Eknath Shinde, Devendra Fadnavis News
एक देवेंद्र फडणवीस हे 35 मतांच्या इतके किंमतवान ; प्रसाद लाड

वारंवार तारखा देऊनही महाविकास आघाडीचे सरकार पडले नाही की कुठला धोका निर्माण झाला नाही. त्यामुळे आता काही आपले सरकार पडत नाही, असे महाविकासच्या नेत्यांना वाटले असावे. पण हा समज करून घेताना त्यांना आपल्या पक्षातील लोकांची नाराजी दिसली नसावी. शिस्तबद्धतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपने मात्र आपले काम सुरूच ठेवले. यावेळी मात्र त्यांनी तारीख जाहीर केली नाही, की कुठले वक्तव्य केले नाही. महाविकासचे नेते गाफील राहिले, अन् चाणाक्ष फडणवीसांनी 'करेक्ट टाइमला करेक्ट कार्यक्रम' केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १० दिवसांपूर्वी म्हणजे १० जून रोजीच इशारा दिला होता. तेव्हा ते म्हणाले होते की, ‘हा पत्त्यांचा बंगला आहे, लवकरच कोसळणार...’ कदाचित हाच महाविकास आघाडीला त्यांचा इशारा असावा, जो महाविकासचे नेते समजू शकले नाही...!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in