महाविकास आघाडी सरकार कधीही पडू शकते... फडणविसांचा पुन्हा बॅाम्ब

महाराष्ट्रातही (Maharashtra) 'ऑपरेशन लोटस'ची चर्चा
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama

नागपूर : गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये (Goa Assembly Election) भाजपने (BJP) राज्यातील सत्ता राखत २० जागा मिळवल्या आहेत. या निवडणुकीची जबाबदारी असलेले महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आज (ता.१७) नागपुरमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. फडणवीस येणार असल्याने विमानतळाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसंदर्भात भाष्य केले.

राजकारणात काहीही होऊ शकते. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कधीही पडू शकते. मात्र, मी काही म्हटले तर लगेच बातम्या होतात. महाराष्ट्रात भाजपचेच पूर्ण बहुमताचे सरकार मी आणणार, असेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले. पाच राज्यातील निवडणुकीमध्ये भाजपला उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), गोवा, उत्तराखंड, मणिपूरमध्ये घवघवीत यश मिळाले. या चार राज्यातील विजयानंतर भाजपच्या नेत्यांकडून 'उत्तर प्रदेश तो झाँकी है महाराष्ट्र अभी बाकी है'! अशी घोषणा देण्यात आली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. त्यातच स्वतः फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार कधीही पडू शकते, असे सांगितल्यामुळे महाराष्ट्रातही 'ऑपरेशन लोटस' यशस्वी होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

Devendra Fadnavis
प्रवीण दरेकरांना सोमवारपर्यंत अटक करु नका!

या वेळी फडणवीस म्हणाले, हा जो सत्कार, स्वागत मी स्वीकारत आहे तो मोदींच्या आणि टीम गोव्याच्या वतीने. तसेच जी संधी मिळाली त्याचे सोने करण्याचा प्रयत्न मी केला. चार राज्यात मिळालेला विजय हा आपल्या लोकांनी दिलेले प्रेम असून मोदींच्या कामाला दिलेली पोचपावती आहे. त्याबद्दल मी आभारी आहे. महाराष्ट्रात २०२४ ला पूर्ण बहुमताचे भाजप सरकार पहायला मिळेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूरमध्ये मिळालेला विजय हा पंतप्रधानांच्या कामाला लोकांनी दिलेली पावती आहे. महाराष्ट्रातही तीच स्थिती आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
भाजपचं ठरलं : कोल्हापूर उत्तरमधून लढणार; फडणवीस दिल्लीतून उमेदवार जाहीर करणार

''ज्या क्षणी महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा भाजप नंबर १ राहील आणि भाजप आपल्या भरवशावर सरकार स्थापन करले, असे यावेळी फडणवीसांनी सांगितले. नागपूर, मुंबई पालिका निवडणूक असो आम्ही तयारच असतो असे सांगताना सध्या स्वतंत्र वाटचाल सुरु असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली आहे. ही ताकद प्रत्येक निवडणुकीत पहायला मिळेल, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com