बावनकुळे, खोपडे यांना मी मंत्रालयातील किडे म्हणायचो : फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी केले चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचे कौतुक
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

नागपूर : आमदार झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे काम मी जवळून बघितले आहे. आपल्या मतदारसंघात निधी कसा आणायचा, यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. मी तर नेहमी म्हणायचो की, चंद्रशेखर बावनकुळे आणि कृष्णाजी खोपडे हे मंत्रालयातील किडे आहेत. ते मंत्रालय असे पोखरत पोखरत जातात आणि कुठलेही काम ते करून आणतात, अशा शब्दांत भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचे कौतुक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. (Devendra Fadnavis appreciated the work of Chandrashekhar Bawankule)

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी बावनकुळे यांच्या कामाचे कौतुक केले.

Devendra Fadnavis
‘केदारांनी अडवलेले ते ४५ लाख मिळाले नसते तर माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली नसती’

ते म्हणाले की, बावनकुळे यांचे काम आपण सर्वांनी जवळून पाहिले आहे. त्यांचा कामाचा आवाका मोठा आहे. सामान्य कुटुंबातून आपल्या भरोशावर त्यांनी स्वतःला उभे केले आहे. बावनकुळे यांच्यासारख्या कार्यकर्त्याला राज्यातील भाजपच्या सर्वोच्च पदावर बसण्याची संधी मिळाली, हेच आपल्या पक्षाचे वैशिष्टय आहे. बावनकुळे यांनी प्रत्येक कामात आपली चुणूक दाखवली आहे.

Devendra Fadnavis
चंद्रशेखर बावनकुळेंनी बायकोसुद्धा पळवून आणलीय : गडकरींची जोरदार फटकेबाजी

आम्ही त्यावेळी विरोधी पक्षात होतो. मतदारंसघासाठी पैसे आणण्याचे काम बावनकुळे आणि माझ्याकडे होते. त्यात पैसे आणण्याचे काम चंद्रशेखर यांचे होते. सगळ्या फायली तयार करून बजेट छापेपर्यंत ते त्या ठिकाणी बसून राहायचे. माझा थोडा परफार्मन्स असल्यामुळे मंत्री थोडे घाबरायचे. मी आणि चंद्रशेखर जायचो. मी गेल्यावर कुठलाही मंत्री आमच्या पत्रावर सह्या करायचा. आमच्या दोघांच्या पत्रावर सही केल्यानंतर त्यापुढे मला माहिती काही माहित नसायचे. त्या कामाचा प्रस्ताव तयार करून ते बजेटपर्यंत न्यायचे. एकवेळ मंत्र्याचा प्रस्ताव बजेटमध्ये यायचा नाही. पण चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रस्ताव बजेटमध्ये येणार, अशा प्रकारचे त्यांचे काम हेाते, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

Devendra Fadnavis
आदित्य ठाकरेंविषयी बोलताना खासदार धैर्यशील मानेंचे डोळे पाणावले; पण...

फडणवीस म्हणाले की, एकवेळ तर असे झाले की विदर्भातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री होते, ते अर्थमंत्र्यांच्या अंगावर गेले. ते म्हणाले की आम्ही मंत्री असूनही आमच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात जास्त पैसे गेले. त्यावेळचे अर्थमंत्री त्या मंत्र्यांना म्हणाले होते की, त्यांच्याकडून शिका. सह्या सगळेच घेऊन जातात. पण ते काम बजेटमध्ये आणायचे कसे, हे बावनकुळे यांना नीट माहिती आहे, त्यामुळे त्यांचे प्रस्ताव बजेटमध्ये येतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com