Devendra Fadnavis Watched The Kerala Story: ‘द केरला स्टोरी’ बघितला, सडक्या मेंदूत येणाऱ्या विचारांना फाशी देण्याची गरज !

Devendra Fadnavis Statement: तशीच खळबळ उडवणारा ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट ठरला आहे.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

Devendra Fadnavis watched 'The Kerala Story' movie in a theater : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून सध्या देशातील राजकारण तापत आहे. राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट खूप गाजला होता. त्यानंतर तशीच खळबळ उडवणारा ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट ठरला आहे. भाजप आणि कॉंग्रेसचे नेते या चित्रपटावरून एकमेकांवर दररोज टिका करत आहेत. (BJP and Congress leaders are criticizing each other daily over this film)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. ९) रात्री हा सिनेमा नागपुरातील सिनेमागृहात बघितला. त्यानंतर रात्री १२.३० वाजता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, देशाच्या विरोधात, महिलांच्या विरोधात कसे षड्यंत्र केले जात आहेत, ते या चित्रपटातून मांडण्यात आले आहे.

हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात एकच विचार येतो की, ज्यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला फाशी देण्याची मागणी केली आहे, अशा नेत्यांनी त्यांच्या सडक्या मेंदूत येणाऱ्या सडक्या विचारांना फाशी देण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाच्या निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या, असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्याचा फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतला.

निश्चितच आम्ही कायदा (लव्ह जिहाद) करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र ही समस्या फक्त कायदा करून सुटणारी नाही, तर त्यासाठी समाजात जागृती होणेही तेवढेच गरजेचे आहे, असेही फडणवीस म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेल्लारीत 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता.

Devendra Fadanvis
The Kerala Story: ''...म्हणून ‘द केरला स्टोरी’महाराष्ट्रात करमुक्त करा!''; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अशा दहशतवादी कट कारस्थानावर आधारित बनवलेल्या 'केरला स्टोरी' या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. ‘द केरला स्टोरी' एका राज्यातील दहशतवादी कारस्थानांवर आधारित असल्याचे सांगितले जाते. केरळ हा देशातला इतकं सुंदर राज्य, जिथे लोक खूप मेहनती आणि प्रतिभाशाली आहेत, तिथे सुरू असलेला दहशतवादी कारस्थान या चित्रपटातून मांडले गेले असल्याचे मोदी म्हणाले होते.

मणिपूर जळत आहे. लोक घर सोडून पळून जात आहेत. पण पंतप्रधान कर्नाटकमधल्या (Karanataka) निवडणुकीत (Election) एका खोट्या चित्रपटाचा प्रचार करत आहेत, अशी घणाघाती टीका ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली होती.

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis आणि Sharad Pawar यांच्यामध्ये जुंपली | BJP | NCP | Sarkarnama Video

“द केरळ स्टोरी' हा खोटा चित्रपट आहे. फक्त आमचा बुरखा दाखवून पैसे कमवायचे आहेत. पंतप्रधान (Prime Minister) द्वेष पसरवत आहेत. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधानांनी खालची पातळी गाठली आहे. असा घणाघाती आरोपही ओवेसी यांनी केला होता. सर्व आरोपांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काल प्रत्युत्तर दिले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com