ड्रोनच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीवरून करणार विकास आराखडा...

खासदार सुनील मेंढे MP Sunil Mendhe म्हणाले, जे काम २०१०ला होणे अपेक्षित होते, ते होऊ शकले नाही. त्याची कारणे अनेक आहेत.
MP Sunil Mendhe
MP Sunil Mendhe Sarkarnama

भंडारा : वाढती लोकसंख्या आणि त्यादृष्टीने शहराच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी शहर विकास आराखडा अद्ययावत करण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली. यासाठी आवश्यक असलेल्या ड्रोन सर्वेक्षणाचा प्रारंभ नगराध्यक्ष खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते दसरा मैदानाजवळील शास्त्री चौकातून करण्यात आला. ड्रोनच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीवरून शहराचा अद्ययावत विकास आराखडा तयार करू, असे खासदार मेंढे म्हणाले.

वाढती लोकसंख्या आणि त्यादृष्टीने आवश्यक असलेल्या बदलांचा विचार करून ठरावीक कालावधीनंतर शहराच्या विकास आराखड्याचे नियोजन करण्यात येते. १९९२ साली विकास आराखडा तयार झाल्यानंतर २०१० ला नव्याने तो तयार होणे अपेक्षित होते. मात्र ते होऊ शकले नाही. या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. शहर विकास आराखडा अद्ययावत करण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले ड्रोन सर्वेक्षण ड्रोन उडविण्याची रीतसर परवानगी जिल्हा प्रशासनाकडून घेत आज काम सुरू झाले.

यावेळी बोलताना खासदार सुनील मेंढे म्हणाले, जे काम २०१०ला होणे अपेक्षित होते, ते होऊ शकले नाही. त्याची कारणे अनेक असतील. पण आजपासून कामाला सुरुवात होत आहे. सुविधा पुरविण्याची जबाबदारी नगरपालिकेची असल्याने त्यासाठी हा विकास आराखडा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ड्रोनद्वारे संपूर्ण शहराचे हे सर्वेक्षण केले जाईल. या माध्यमातून मिळणाऱ्या छायाचित्रांद्वारे प्रशासनाला शहराची वस्तुस्थिती लक्षात येईल. त्याआधारे रस्ते आणि अन्य गोष्टींचे योग्य नियोजन करणे सोयीचे होणार आहे. ड्रोन सर्वेक्षणानंतर तयार झालेल्या या आराखड्यावर आक्षेप व सूचना मागविल्या जातील. सुनावणी होईल व नंतर हा आराखडा अंतिम होईल. आराखड्यामुळे शहर विकासात भर पडणार असून नागरिकांनाही योग्य त्या सोयी-सुविधा पुरविण्यात नगर प्रशासन यशस्वी ठरेल असे खासदार. सुनील मेंढे म्हणाले.

MP Sunil Mendhe
खासदार श्रीरंग बारणेंचा राज्य सरकारला इशारा; भंडारा डोंगरातून रिंगरोड नेण्यास केला विरोध 

याप्रसंगी साहाय्यक संचालक नगर रचना सुनील देशमुख, मुख्याधिकारी विनोद जाधव, नगरसेवक रुबी चढ्ढा, विनयमोहन पशिने, भूमेश्वरी बोरकर, आशु गोंडाने, शमीम शेख, रजनीश मिश्रा, कैलास तांडेकर, आशाताई उके, वनिता कुथे, साधना त्रिवेदी, मधुरा मदनकर, गिता सिडाम, जयश्री बोरकर, नगर रचना विभागाचे मुकेश कापसे, निखील कांबळी, अनिकेत दुर्गवळे, पवन कनोजे, माला बगमारे, प्रीती गोसेवाडे, मिलिंद मदनकर, आबिद सिद्धिकी, विकास मदनकर, मयूर बिसेन, शैलेश मेश्राम, मनोज बोरकर, अजीज शेख, पप्पू भोपे, संतोष त्रिवेदी, अविनाश ब्राम्हणकर, रोशन काटेखाये, भूपेश तलमले, अमित बिसेन, फईम शेख, अरविंद ढोमणे, घनश्याम जांगळे, राजेश टिचकुले, देविदास भारद्वाज, आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com