Thackeray : कोलांटउड्या मारत देशमुख पुन्हा शिवसेनेत आले, आता राठोडांना टक्कर देणार का?

अखेर काल 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Uddhav Thackeray's Shivsena
Uddhav Thackeray's ShivsenaSarkarnama

संजय राठोड

यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते आणि माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुखांचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर काल 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

संजय देशमख यांनी कॉंग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर ते शिवसेनेत गेले आणि जिल्हाप्रमुख पदही मिळवले. मात्र १९९५ च्या निवडणुकीत देशमुख यांनी शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडून शिवसेनेचे (Shivsena) तत्कालीन आमदार बाळासाहेब ऊर्फ श्रीकांत मुनगिनवार यांच्या विरोधात अपक्ष म्हणून दिग्रस-आर्णी विधानसभेची निवडणूक लढविली आणि त्यात देशमुख विजयी झाले. संजय देशमुख सलग दोन टर्म निवडून आले आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या मंत्रिमंडळात राज्य क्रीडामंत्री म्हणून अडीच वर्ष काम करण्याची त्यांना संधी मिळाली. तदनंतर दिग्रस-आर्णी मतदारसंघ बाद झाला आणि नव्याने मतदारसंघाची रचना झाली. त्यात आर्णी-केळापूर मतदारसंघ राखीव झाला तर दिग्रस-दारव्हा, नेर या मतदारसंघातून संजय देशमुख यांनी विद्यमान मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या विरोधात दोन वेळा निवडणूक लढवली. पण दोन्ही वेळा त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. पहिले कॉंग्रेस नंतर शिवसेना, त्यानंतर भाजप आणि आता पुन्हा शिवसेनेत संजय देशमख यांनी प्रवेश केला आहे.

संजय देशमुख यांनी तीन वर्षांपहिले यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी मंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून शिवसेनेची उमेदवारी मागितली होती. मात्र संजय देशमुखांना प्रचंड विरोध झाल्याने त्यावेळी त्यांना सेनेकडून उमेदवारी मिळाली नाही. मात्र शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर संजय राठोडांनीदेखील शिवसेनेची साथ सोडली. अशात समोर चालून आलेल्या संधीचा फायदा संजय देशमख यांनी घेण्याचे आता ठरवले आहे. पण ही लढाई वाटते तेवढी सोपी नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. एक संजय प्रस्थापित संजय राठोड यांना कशी टक्कर देणार, हे बघणे औत्सुक्याचे राहणार आहे.

Uddhav Thackeray's Shivsena
Laxman Hake On Shahajibapu Patil | शिवसेना नेते लक्ष्मण हाके रस्त्याच्या दुराव्यस्थेवरून आक्रमक

मंत्री संजय राठोड सेनेत होते जिल्ह्याचे बॉस..

शिवसेनेकडून सलग चार वेळा विक्रमी मतांनी निवडून येणारे संजय राठोड यांनी राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन विजयी होण्याचा मान मिळवलेला आहेत. मंत्री संजय राठोड सेनेत असताना तेच चालक-मालक होते. माजी मंत्री संजय देशमुख यांनी सेनेत प्रवेश केल्याचं राठोडांना दुःख आहे. मात्र त्यांना बोलून दाखवता येत नाही, अशा स्थितीत सध्या संजय राठोड असल्याचे दिसते.

पक्षप्रमुखांच्या दुःखापेक्षा माझे दुःख लहान..

माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांचे कट्टर विरोधक म्हणून माजी मंत्री संजय देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. मुनगिनवार यांच्या विरोधात सेनेतून बंडखोरी करत दोन वेळा अपक्ष निवडणूक देशमुखांनी लढवली होती. त्यामुळे माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांची मनधरणी माजी मंत्री देशमुख यांनी केली आणि त्यांच्या नेतृत्वात संजय देशमुखांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधलं. माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांनी म्हटलं की, "संकटाच्या काळात पक्षाला साथ देणारा प्रत्येक माणूस आमचा मित्र आहे. वास्तविक मी स्वतः दोन वेळा देशमुखांकडून पराभूत झालो त्यांचे दुःखही आज मनात आहे. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दुःखापेक्षा माझे दुःख लहान" असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पक्षप्रमुख ठाकरे लवकरच जिल्हा दौऱ्यावर..

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर सेनेला मोठे धक्के सहन करावे लागले. बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज आणि माजी मंत्री संजय देशमुख शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची विराट जाहीर सभा दिग्रस-दारव्हा मतदारसंघात पुढील महिन्यात होणार आहे. यावेळी लाखोंच्या उपस्थितीत अनेक पदाधिकारी सेनेत प्रवेश करणार असून त्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in