
Gadchiroli News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. ज्या ठिकाणी तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यानजीक असलेल्या दामरंचा आणि छत्तीसगडच्या सीमेवर जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी सी-60 जवानांचा गणवेश परिधान करत मीही तुमच्यासोबत आहे, असा संदेश दिला.
तसेच गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या सी 60 जवानांचा फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी फडणवीस म्हणाले, "नक्षलवाद ही विचारांची नाही, तर आता देशविरोधी लढाई आहे. लोकशाही आणि संविधान न मानणाऱ्यांची ती लढाई आहे. या नक्षल कारवायांमध्ये अनेक सर्वसामान्य माणसांचे बळी गेले", असंही ते यावेळी म्हणाले.
"मी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो. कारण C60 जवान अतिशय चांगलं काम करत आहेत. नक्षलवाद संपविण्यात C60 जवानांनी मोठं यश मिळवलं आहे. यासाठी बलिदान सुद्धा दिलं आहे. त्यामुळं प्राईम फोर्स म्हणून C60 ओळखले जाते. ज्या विद्यार्थ्यांला नक्षलवाद्याने मारले त्याला यमसदनी पाठविण्याचं काम आपल्या जवानांनी केलं आहे", असं ते म्हणाले.
"छत्तीसगड सीमेजवळ पोलीस स्टेशन नाही. त्या दामरेचा नक्षलग्रस्त भागात पोलीस स्टेशन सुरू करण्यात आले आहे. C60 जवानांनी नक्षल भागातील लोकांशी संवाद सुरू केला आहे. आपल्या कामाच्या पलीकडे जाऊन नक्षलग्रस्त भागातील लोकांना मदत केली जात आहे.
शहरी नक्षलवादाची सुद्धा मोठी समस्या आहे. जेव्हा स्थानिक स्तरावर नक्षलवाद्यांना यश मिळत नाही, तेव्हा ते लोकांचे ब्रेनवॉश करुन ही लढाई शहरांमध्ये लढू पाहताहेत. लोकशाही आणि संविधान न मानणे, हेच त्यांचे काम आहे. ही अराजकता आहे", असंही फडणवीस म्हणाले.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.