Cabinet Extension News : मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Eknath Shinde News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भेट घेतली.
Devendra Fadanvis News
Devendra Fadanvis Newssarkarnama

Devendra Fadnavis News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवारी भेट घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. या भेटीनंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार या विषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, यावर भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले, 'मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. विस्तार कधी होणार, याबाबत मुख्यमंत्री शिंदे सांगतील'.

Devendra Fadanvis News
Eknath Shinde On Cabinet Expansion: अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर, राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितले!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या संदर्भातही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया देणार नाही. आगामी निवडणुकीवर भाष्य करताना ते म्हणाले, 'शिवसेना-भाजप सर्व निवडणुका एकत्र लढवण्यावर चर्चा झाली. तालुका-जिल्हा स्तरावर दोन्ही पक्षात समन्वय ठेवण्याचा निर्णय झाला. एकत्र निवडणूक लढण्यासाठी रणनीती आखायची जाणार आहे.

Devendra Fadanvis News
Anurag Thakur News : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरांच्या वक्तव्याने कल्याण लोकसभा मतदारसंघ पुन्हा चर्चेत

नगरच्या एका कार्यक्रमात औरंगजेबाचे फोटो झळकवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन फडणवीस म्हणाले, 'औरंगजेबाजे फोटो कुणी झळकवत असेल तर ते मान्य केले जाणार नाही. आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत. कुणी औरंग्याचे नाव घेत असेल तर माफी नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com