Devendra Fadnavis: ''मुंबई कुणाच्या बापाची नाही आणि..!''; फडणवीसांनी कर्नाटकला ठणकावलं

Devendra Fadnavis: ... म्हणून मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा
Devendra Fadnavis; Basavaraj Bommai
Devendra Fadnavis; Basavaraj Bommai Sarkarnama

Devendra Fadnavis News : एकीकडे सीमावाद तापलेला असताना कर्नाटककडून महाराष्ट्राला डिवचण्याचं काम सुरु आहे. याचदरम्यान, हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने सीमावादावर एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्याचे पडसाद आता कर्नाटकमध्ये उमटत आहे. कर्नाटकच्या मंत्र्यांनी मुंबईत 20 टक्के कन्नडी लोक राहत आहे. त्यामुळे मुंबई ही कर्नाटकाचीच असून तिला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा अशी मुक्ताफळे कर्नाटकातील मंत्री आणि आमदारांनी उधळली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटकला सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

हिवाळी अधिवेशनात देखील कर्नाटकच्या मंत्री व आमदार यांच्या वादग्रस्त विधानांचे तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील कर्नाटककडून सीमाप्रश्नाला चुकीचं वळण देण्याचा प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्र्यांनी त्यावर निवेदन करावं आणि सभागृहाच्या भावना कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना कळवाव्यात. लेखी पत्र देऊन त्यांना ताकीद द्यावी. कर्नाटकाच्या कायदा मंत्री आणि अपक्ष आमदाराच्या विधानाचा निषेध नोंदवावा अशी मागणी सभागृहात केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या मागणीनंतर भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले, मुंबई कुणाच्या बापाची नाही. मुंबईवर दावा सांगणं हे खपवून घेतलं जाणार नाही. त्याबद्दल त्यांचा निषेध आम्ही करतो. तशा प्रकारचं निषेधाचं पत्रं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत. त्यांनी गृहमंत्र्यांसमोर ठरलेल्या गोष्टींचं उल्लंघन करणं दोन्ही राज्याच्या संबंधाबाबत योग्य नाही हे कडक शब्दांत सांगण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल.

Devendra Fadnavis; Basavaraj Bommai
Winter Session : अण्णा हजारेंची 'ती' मागणी शिंदे-फडणवीसांनी पूर्ण केली..

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे बैठक झाली. तेव्हा दोन्ही राज्यांनी नवे दावे न करण्याचं मान्य केलं. त्यांनी गृहमंत्र्यांसमोर ठरलेल्या गोष्टींचं उल्लंघन करणं दोन्ही राज्याच्या संबंधाबाबत योग्य नाही हे कडक शब्दात सांगणार असून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणानुसारच काल आपण ठराव केला आहे.

पण कर्नाटकच्या मंत्री, आमदार किंवा काँग्रेसच्या अध्यक्षांनी केलेले दावे बैठकीशी विसंगत असून ते पूर्णपणे चुकीचे आहेत असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. अमित शाह यांना सांगू ठरलेल्या गोष्टीचं पालन महाराष्ट्र सरकार करत आहे. मात्र, कर्नाटक सरकार करत नाही. हे योग्य नाही. त्यामुळे शाह यांनी कर्नाटकाच्या बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे.केंद्रीय मंत्र्यांना विनंती करणार आहे.

Devendra Fadnavis; Basavaraj Bommai
Abdul Sattar : गायरान जमीन घोटाळ्यावर अखेर सत्तारांनी दिले स्पष्टीकरण..; म्हणाले..

अजित पवार काय म्हणाले?

कर्नाटक सरकारचे कायदामंत्री मधूस्वामी यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करावी अशी मागणी त्यांच्या विधिमंडळात केली. तसेच मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक राहतात असा जावईशोधही लावला. कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य लक्ष्मण सावदी यांनी तर मुंबई ही कर्नाटकचीच आहे असा दावा करून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय आहे.

महाराष्ट्रात कन्नड माणसं नाहीत का? तर महाराष्ट्रात संपूर्ण भारतातील विविध प्रांतातील लोक अतिशय गुण्यागोविंदाने राहतात. मात्र, सीमाप्रश्नाला अशाप्रकारे चुकीचं वळण देण्याचं आणि सीमावासीयांच्या भावना दुखावण्याचं काम कर्नाटक सरकार करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com