भाजप, शिवसेनेला आणखी धक्के देण्याच्या तयारीत; स्थानिक स्वराज्य संस्थांवरही लक्ष

सिंदखेड राजा नगरपरिषदेमध्ये भाजप (BJP) अन् शिंदे गटाची सत्ता स्थापन करण्याची मागणी
BJP
BJPsarkarnama

सिंदखेड राजा : मातृतिर्थ सिंदखेड राजा नगर परिषदेमध्ये भाजप (BJP) आणि शिंदे गटाची सत्ता स्थापन करण्याची मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विष्णु मेहेत्रे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन करून मागणी केली आहे. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, शहरातील नगरपरिषदेमध्ये अजूनपर्यंत महाविकास आघाडीची सत्ता आहे.

मार्च २०१९ मध्ये सिंदखेर राजा शहरातील नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुक झाली होती. त्यावेळेस जनतेतून थेट नगराध्यक्षाची निवडणुक झाली होती. त्यावेळेस केंद्रात व राज्यात भाजप व शिवसेनेची युती असल्यामुळे नगरपरिषदेमध्ये सुध्दा युती करण्यात आली. त्यानुसार तडजोडीनंतर शिवसेनेकडे नगराध्यक्षपद व भाजपकडे उपनगराध्यक्ष पद कार्यकाल संपेपर्यंत ठरविण्यात आले होते. त्याप्रमाणे नगराध्यक्ष शिवसेनेचा निवडुन आला व उपनगराध्यक्ष भाजपचा झाला. मात्र, सत्ता स्थापनेवेळी अडचणी आल्यामुळे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेस व काँग्रेस अशी महाविकास आघाडी स्थापन झाली.

BJP
देवापेक्षा जास्त विश्वास शिंदे, फडणवीसांवर, मराठा समाजाला लवकरच आरक्षण..

त्यामुळे स्थानिक पातळीवर सुध्दा भाजपचा उपनगराध्यक्ष असतांना व पाच वर्षासाठी तडजोड झालेली असतांना सुध्दा महाविकास आघाडी करण्यात आली. त्यामुळे भाजपच्या उपनगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे उपनगराध्यक्षाने राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपनगराध्यक्ष झाला. नगरपरिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली. मात्र, तीन महिण्यापूर्वी शिवसेना (शिंदे गट) व भाजपची सत्ता स्थापन झाली. मात्र, सिंदखेड राजा शहरात नगरपरिषदेमध्ये अजूनपर्यंत महाविकास आघाडीची सत्ता आहे.

BJP
'तुमचे नगरसेवक पद घालवतो..' २५ लाखांची खंडणी : आरटीआय कायद्याचा गैरवापर ऐरणीवर

येथील शिवसेनेचा नगराध्यक्ष व काही नगरसेवकांनी शिवसेनेचे पक्षप्रमख उध्दव ठाकरे यांची शिवसेना सोडुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटाचे जिल्ह्याचे खासदार व सिंदखेड राजा विधानसभेचे शिंदे गटाचे माजी आमदार यांनी सिंदखेड राजा शहरातील नगरपरिषद मधील जिल्ह्यातील एकमेव ठिकाणी असलेली महाविकास आघाडी तोडावी व भाजप सोबत युती करावी, या पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in