Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात १० दिवस तळ ठोकणार; पण...

Arvind Kejriwal News : महाराष्ट्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या...
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Sarkarnama

Arvind Kejriwal News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पुढील १० दिवस महाराष्ट्रात तळ ठोकणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र ते कुठल्याही राजकीय कारणासाठी महाराष्ट्रात आले नसून ते नागपूरमध्ये विपश्यना शिबिरामध्ये १० दिवस सहभागी झाले आहेत. 'पुढील काही दिवस आपण विपश्यना साधना आपण करणार आहोत', असं माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं.

केजरीवाल म्हणाले, ''मी नागपूरला (Nagpur) विपश्यना करण्यासाठी आलो आहे. मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी विपश्यना साधना करतो. जवळपास १९९६ पासून मी विपश्यना साधना करत आहे. दर वर्षी काही दिवस मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी विपश्यना साधना करतो. विपश्यना साधना ही भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला शिकवली होती. या विपश्यना साधनेच्या माध्यमातून आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक लाभ मिळतो'', असं ते म्हणाले.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : 'आप' राष्ट्रीय राजकारणात? स्थापनेपासून डोळे दिपवणारी घौडदौड

तसेच ''या विपश्यना साधनेमुळे वैयक्तिक मला देखील फायदे झाले. त्यामुळे दर वर्षातून मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा विपश्यना साधना मी करतो. खरं तर प्रत्येकाने एकवेळा विपश्यना ध्यान केले पाहिजे. आपल्या देशात विपश्यनेचे अनेक केंद्र आहेत. त्यापैकी नागपूर एक आहे. मागच्या वेळी विपश्यना करण्यासाठी जयपूरला गेलो होतो. मात्र यावेळी नागपूरमध्ये विपश्यना सुरू असल्याने मी इकडे आलो असून पुढील काही दिवस आपण विपश्यना साधना आपण करणार आहोत'', असं अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले.

Arvind Kejriwal
Bharat Jodo Yatra : भाजप-संघासोबतच काही मीडियाकडूनही द्वेष पसरवण्याचं काम; राहुल गांधीचा हल्लाबोल!

दरम्यान, देशात सध्या आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) चांगली घौडदौड सुरू केली आहे. दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर आता देशभरात आम आदमी पक्ष हळूहळू वाढताना दिसत आहे. गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील'आप'ने नशीब आजमावलं. त्यामुळे आता हळूहळू 'आप' राष्ट्रीय राजकारणात (National politics) उतरताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com