Amravati Local Election: बच्चू कडूंना होमग्राउंडवर मोठा धक्का : चांदूरबाजार समितीत पॅनेलचा पराभव

Chandur Bazar Kharedi Vikri Society Election: विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची जल्लोष करताना '५० खोके एकदम ओके' अशी नारेबाजी
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama

Chandurbazar Election : शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे.चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत प्रहारचे फक्त तीन उमेदवार निवडून आल्याने बच्चू कडूंसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे यावेळी विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करताना '५० खोके एकदम ओके' अशी नारे बाजी केली.

चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या १५ संचालकपदासाठी १९ मार्चला मतदान प्रक्रिया पार पडली. तर सोमवारी (२० मार्च) मतमोजणी झाली. यात शेतकरी पॅनल आणि सहकार यांच्यात चुरशीच्या लढत झाली. बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलचे १२ संचालक विजयी झाले. तर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या शेतकरी पॅनलचे फक्त तीन संचालक निवडून आले.

Bachchu Kadu
Old Pension Scheme: जुनी पेन्शन संघटनेत फुट; संघटनेचा समन्वय समितीवर गंभीर आरोप

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच अटीतटीच्या लढत पाहायला मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, आर. व्ही. भुयार यांनी निवडणूकीचा निकाल जाहीर केला. सहायक निबंधक एस.टी.केदार यांच्या नेतृत्त्वात सहकार विभागाच्या एकूण ३१ कर्मचाऱ्यांनी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली. मतमोजणी च्या दिवशी पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

या निवडणुकीत तालुका खविसवर बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, प्रमोद कोरडे यांच्या सहकार पॅनलने प्रहारला धूळ चारत वर्चस्व प्रस्थापित केले.तर तळवेल केंद्रावर बबलू देशमुख यांच्या गटाने विजय मिळवला. तर बहुतांश ठिकाणी सहकार व शेतकरी पॅनलमध्ये जयपराजयासाठी अवध्या एका मताचा फरक पाहायला मिळाला.

विजयी उमेदवारांची नावे आणि मते

सहकार पॅनेलच्या प्रताप अण्णासाहेब किटुकले (२८), श्रीपाद आसरकर (२७), कुलदीप सोनार (२७), राजेंद्र खापरे (२७) मते मिळाली. शेतकरी पॅनलच्या अनंत खुशालराव काळे (२७), साहेबराव पोहोकार (२७), प्रभाकरराव किटुकले (२७) मते मिळाली. विशेष म्हणजे, या ठिकाणी एकही मत बाद झाले नाही. तर वैयक्तिक भागधारक मतदार संघात सहकार पॅनलचे आठही उमेदवार विजयी झाले.

यामध्ये वैयक्तिकचे, सतीश गणोरकर (२१४१) मते, संजय गुजर (२०३०), रावसाहेब लंगोटे ( २१११), महिला राखीव गटात, अनिताताई स्वप्निल देशमुख (२१७०), सुनिताबाई काळे (२१५४), विमुक्त जाती जमाती मध्ये विलास शेकार (२२२२), अनुसूचित जाती जमाती मध्ये इमावमध्ये शिवाजी बंड (२२३८), श्रीकृष्ण वानखडे (२१५५) यांचा समावेश आहे. तर एकूण ५५८ मते बाद झालीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in