BJP : एकाच कामाचे, एकाच दिवशी दोनदा लोकार्पण; जिल्हाध्यक्ष म्हणतात, काही नवीन नाही !

public offering : एका तासाच्या अंतराने भाजपने त्याच कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवला आहे.
Chandrapur
ChandrapurSarkarnama

Same work, twice public offering : चंद्रपुरातील आझाद बागेच्या लोकार्पण सोहळ्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या अतिउत्साहामुळे झालेला राडा शहरवासींयांच्या अद्याप स्मरणात आहे. आता या प्रसिद्धीलोलुप पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एक उपद्व्याप केला. येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या बांधकामाचे लोकार्पण आणि नव्या कामाच्या भूमिपूजनाचा शासकीय कार्यक्रम उद्या शनिवारी होणार आहे. या शासकीय कार्यक्रमानंतर एका तासाच्या अंतराने भाजपने (BJP) त्याच कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवला आहे.

भाजपच्या (BJP) या निमंत्रण पत्रिकेची समाज माध्यमांवर खिल्ली उडविली जात आहे. क्रीडा संकुलासाठी निधी शासनाने दिला की भाजपच्या नेत्यांनी-पदाधिकाऱ्यांनी, असा सवाल नेटकरी विचारत आहे. आझाद बागेच्या लोकार्पण सोहळ्यात जिल्ह्यातील (Chandrapur) एकाही लोकप्रतिनिधीला आमंत्रित केले नव्हते. लोकार्पणाच्या कोनशिलेवर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नावे होती. यावर आक्षेप घेतल्यानंतर वेळेवर कोनशिला आणि नवी शासकीय निमंत्रण पत्रिका तयार केली. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची नावे टाकण्यात आली. परंतु प्रत्यक्ष लोकार्पण सोहळ्यात चांगलाच राडा झाला.

आताही तोच प्रकार भाजपने केला. जिल्हा क्रीडासंकुलातील सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल ग्राऊंड आणि चेंजिंग रुमचे लोकार्पण आणि वॉकींग ट्रॅकचे भूमिपूजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाच्या शासकीय निमंत्रण पत्रिकेत जिल्हा क्रीडा अधिकारी विनीत आहेत. शासकीय पत्रिकेत विशेष अतिथी म्हणून खासदार अशोक नेते आणि बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांची नावे आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्यातील सर्व आमदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ४.३० वाजता आयोजित केला आहे.

दुसरीकडे भाजपने स्वतंत्र निमंत्रण पत्रिका तयार केली. त्यांच्या पत्रिकेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याच हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन होईल. मात्र, विशेष अतिथी आणि प्रमुख अतिथी बदलले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि शहर अध्यक्ष मंगेश गुलवाडे विशेष अतिथी आहेत. माजी महापौरांसह भाजपच्या माजी नगरसेवकांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित पत्रिकेत मानाचे स्थान मिळाले आहे. या पत्रिकेचे शहरात वाटपसुद्धा केले. हा कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता होईल. विनीतमध्ये भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर आहे. शासकीय कार्यक्रम झाल्यानंतर त्याच ठिकाणी तोच कार्यक्रम घेण्याचा अधिकार भाजपला दिला कुणी, यावर आता कुणी बोलायला तयार नाही. माजी नगरसेवक राहुल पावडे यांनीही यावर बोलणे टाळले. दुसरीकडे भाजपची पत्रिका आता समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपच्या नेत्यांनी- पदाधिकाऱ्यांनी क्रीडासंकुलासाठी पैसे दिले का, असा प्रश्न विचारला जात आहे.

शासनाच्या निधीतून विकास कामे होत असताना भाजपचे पदाधिकारी स्वतःच्या पक्षाच्या नावाने पत्रिका वाटणे, फलक लावणे, असा पोरखेळ करीत आहेत. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नवीन पायंडा पाडला जात आहे. राजकारणात अनेक पदे उपभोगलेल्या नेत्यांना ही बाब समजू नये, याचे आश्चर्य वाटते.

- रामू तिवारी, शहर अध्यक्ष, कॉंग्रेस कमिटी चंद्रपूर.

Chandrapur
Bhandara जिल्ह्यात अंतर्गत वादात पिछाडीवर गेली भाजप, सत्तेचा प्रभाव दिसला नाही...

वाढदिवस आणि भाषण..

शंकरपूर येथे काल गुरुवारला पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि लोकार्पण आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रम शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून आयोजित केला होता. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. मात्र, मंचावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांऐवजी भाजपच्या कार्यकर्त्यांचाच भरणा अधिक होता. एवढेच नव्हे, तर भाजपचे पदाधिकारी राजू देवतळे आणि घनश्याम डुकरे यांची भाषणे झाली. समीर राचलवार या भाजप कार्यकर्त्यांचा वाढदिवससुद्धा साजरा झाला. हा भाजपचा खासगी कार्यक्रम नव्हता. त्यामुळे या कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी चिमूर तालुका कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी केली.

कार्यक्रम एकच फक्त पत्रिका दोन...

जो शासकीय कार्यक्रम आहे, तोच मुख्य कार्यक्रम आहे. पण आमच्या नेत्यांनी काम मंजूर करवून आणले. त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाच्या लोकांना निमंत्रित करण्यासाठी एक स्वतंत्र पत्रिका छापली. फक्त त्यामध्ये वेळ मागेपुढे झाली असावी. या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन आणि आयोजनाची जबाबदारी राहुल पावडे यांच्यावर आहे. हा सर्वपक्षीय कार्यक्रम आहे. सर्व पक्षांच्या लोकांसोबत आमच्या पक्षाचेही लोक तेथे असतील. जो पक्ष सत्तेत असतो, तो आपल्या लोकांना सोबत घेऊन चालतोच. विजय वडेट्टीवार पालकमंत्री असताना त्यांच्या पक्षाचे लोक शासकीय कार्यक्रमात मंचावर राहतच होते. त्यात काही नवीन नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in