ओबीसी बांधवांचा निर्धार : आरक्षण नाही, तर मतदान नाही; नेत्यांना भरली धडकी...

नाना पटोले, खासदार सुनील मेंढे आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Nana Patole, Sunil Mendhe and Prafull Patel) यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांना आता घाम फुटला आहे.
Nana Patole, Sunil Mendhe and Prafull Patel
Nana Patole, Sunil Mendhe and Prafull PatelSarkarnama

भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) राज्य सरकारने काढलेला अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केला आहे. त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत. आरक्षण नाही, तर मतदान नाही, असा निर्धार जिल्ह्यातील ओबीसी मतदारांनी केला आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांना (OBC Leaders) आता चांगलाच घाम फुटणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवर त्याचा मोठा प्रभाव पडेल, असे चित्र दिसू लागले आहे. ओबीसी बांधवांनी मतदान न करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे भंडारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर गडद सावट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील मोठा बहुसंख्याक समाजच मतदानात सहभाग होणार नसल्याने भंडारा जिल्ह्यातील कॉंग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप नेते खासदार सुनील मेंढे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांना आता घाम फुटला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काल २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला अध्यादेश रद्द करण्यात आला आहे. त्याच्या फटका भंडारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला बसला आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषदेत १३ तर पंचायत समितीच्या २५ जागांवर ओबीसी बांधवांना निवडणुकीपासून मुकावे लागणार आहे. यात भंडारा जिल्ह्यातील चुल्हाड, सीहोरा, गर्रा, कांद्री, डोंगरगाव, वरठी, लाखोरी, मुरमाडी सा, केसलवाडा वाघ, मुरमाडी/ तूप, सिल्ली, ब्राम्ही, भुयार ह्या जिल्हा परिषद क्षेत्राचा तर साखळी, अंबागढ, खापा, माडगी, देव्हाडी, पाचगांव, पालोरा, मोहगांव देवी, कुंभली, वडद, सानगडी, सालेभाटा, केसलवाडा वाघ, किटाली, कौथुरना, धारगाव, खोकरला, कोढी , पहेला, चिचाळ, पिंपळगाव, कोदुर्ली, मासळ, भागडी, पिंपळगाव को या पंचायत समिती गणांचा समावेश आहे.

Nana Patole, Sunil Mendhe and Prafull Patel
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको ही आमची स्पष्ट भूमिका!

केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकांमुळे आपले आरक्षण गेल्याची भावना ओबीसी समाजात निर्माण झाली आहे. केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महाविकास सरकार सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडू शकले नाही. त्याच्याच हा परिणाम असल्याचे ओबीसी बांधव सांगत आहेत. त्यांनी संताप व्यक्त करत येत्या निवडणुकीत मतदान न करण्याच्या निर्णय घेत आपल्या घरासमोर निषेध लिहिलेली पाटी लावण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या २१ डिसेंबरच्या भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी बांधव मतदान करणार नाही, हे निश्‍चित असल्याचे मानले जात आहे.

आपल्याला संपविण्याचा हा डाव असून आपली खरी ताकद दाखविण्याची ही वेळ असल्याचे ओबीसी बांधव म्हणत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आरक्षण पूर्ववत लागू होत नाही, तोपर्यंत येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीला मतदान न करण्याच्या निर्णय ओबीसी क्रांती मोर्चाने घेतला आहे. ओबीसी समाजाच्या या निर्णयामुळे भंडारा जिल्ह्यातील मोठ्या ओबीसी नेत्यांना घाम फुटला आहे. आधीच जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांची मनधरणी करण्यात नेत्यांचा कस लागत असताना आता चक्क ओबीसी बांधवांनी मतदान न करण्याच्या निर्णय घेतल्याने त्यांची मनधरणी कशी करावी, असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला असून ओबीसी बांधवांच्या रोषाला नेत्यांना सामोरे जावे लागणार, हे निश्‍चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com