Nagpur News: ठरलं एकदाचं ! कॉंग्रेसचे समर्थन विमाशिचे सुधाकर अडबाले यांना…

MLA Vijay Wadettiwar यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची आज बैठक पार पडली.
Sudhakar Adbale, Vijay Wadettiwar and Sunil Kedar
Sudhakar Adbale, Vijay Wadettiwar and Sunil KedarSarkrnama

Nagpur Teachers Constituency Election : नागपूर (Nagpur) शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत कॉंग्रेसचे समर्थन मिळविण्यासाठी शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांच्यात रेस लागली होती. अखेर कॉंग्रेसचे समर्थन मिळविण्यात सुधाकर अडबाले यांना यश आले आहे.

अनेक नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसनं (Congress) विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांना समर्थन जाहीर केले आहे. माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची आज बैठक पार पडली. नाना पटोले (Nana Patole) यांच्या अनुपस्थित झालेल्या या बैठकीत अडबालेंना समर्थन जाहीर करण्यात आलं आहे. काँग्रेसचे सर्व नेते एकत्रितपणे अडबाले यांचा प्रचार करणार आहेत. २२ जानेवारीला सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

विजय वडेट्टीवार यांच्या घरी झालेल्या बैठकीला माजी मंत्री आमदार सुनील केदार, डॉ. बबनराव तायवाडे, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, माजी मंत्री राजेंद्र मूळक उपस्थित होते. या बैठकीत या नेत्यांना विमाशिचे सुधाकर अडबाले यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. येवढेच नव्हे तर येत्या २२ तारखेपासून कॉग्रेसचे नेते सुधाकर आडबाले यांचा प्रचार करणार आहेत.

Sudhakar Adbale, Vijay Wadettiwar and Sunil Kedar
Congress : प्रदेश काँग्रेस कार्यकरिणीच्या बैठकीत का भडकले विजय वडेट्टीवार?

विमाशिचे सुधाकर आडबाले नागपूर विभागातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार झाल्याचे सुनील केदार यांनी जाहीर केले. सुधाकर अडबाले यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी कॉंग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. कॉंग्रेसचे सर्व नेते एकत्र येऊन आडबाले यांचा प्रचार करणार आहेत. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, या महायुतीच्या सरकारने शिक्षकांची वाट लावली आहे. त्यांनी हे विसरू नये की, विदर्भ हा कॉग्रेसचा गड आहे आणि नेहमी राहणार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in