वाळू तस्करांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; मोठ्या नेत्याच्या कार्यकर्त्याचा हात?

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील मोहाडीचे तहसीलदार दीपक कारंडे यांच्यावर काल वाळू तस्करांनी जीवघेणा हल्ला केला. जिल्ह्यातील एका बड्या नेत्याच्या खासगी संघटनेच्या कार्यकर्त्याचे नाव या हल्लाप्रकरणी समोर येऊ लागले आहे.
Bhandara Sand Mafiya
Bhandara Sand MafiyaSarkarnama

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील मोहाडीचे तहसीलदार दीपक कारंडे यांच्यावर काल वाळू तस्करांनी जीवघेणा हल्ला केला. जिल्ह्यातील एका बड्या नेत्याच्या खासगी संघटनेच्या कार्यकर्त्याचे नाव या हल्लाप्रकरणी समोर येऊ लागले आहे. तोच कार्यकर्ता मुख्य सूत्रधार असल्याची चर्चा जिल्ह्यात दबक्या आवाजात सुरू झाली आहे. राज्याचे गृहमंत्री आणि जिल्‍याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) तस्करांविरोधात कठोर पावले केव्हा उचलणार, याची प्रतीक्षा जिल्हावासीयांना आहे.

एका बड्या नेत्याच्या आशीर्वादाने तर हा सर्व वाळू तस्करीचा (Sand Mafiya) प्रकार तर सुरू नाही ना, या चर्चेने कालच्या घटनेनंतर जोर धरला आहे. वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेले मोहाडीचे तहसीलदार दीपक कारंडे यांच्यावर वाळू तस्करांनी काल जीवघेणा हल्ला केला होता. वाळू तस्करांपासून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तहसीलदारांनी त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीने हवेत गोळीबार केला. वाळू तस्करांद्वारे जेसीबीच्या (JCP) पंजाने तहसीलदार दीपक कारंडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हा लगेच त्यांनी दोन राऊंड (Firing) हवेत फायर केले.

त्यानंतर तहसीलदार कारंडे यांनी मोहाडी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर लगेच जेसीबी व टिप्पर चालक, मालक यांच्या विरुद्ध मोहाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून जेसीबी चालकाला अटक केली आहे. भंडारा जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. वाळू तस्करांवर थेट मोक्का लावण्याची त्यांनी तंबी दिली होती. त्यामुळे आता या प्रकरणी ते स्वतः लक्ष देतात का, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

काल दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास मोहाडीचे तहसीलदार दीपक कारंडे यांना रोहा या गावी तस्करांनी साठवून ठेवलेली वाळू जेसीपीद्वारे टिप्परमध्ये भरून चोरी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांच्या चमू सह रोहा येथे प्रत्यक्षात त्यांनी भेट दिली असता जेसीपीद्वारे टिप्परमध्ये वाळू भरण्याचे काम सुरू होते. दरम्यान तहसीलदारांनी ते काम थांबवून आम्हाला शासकीय कार्यवाही करण्यास मदत करावी, असे आवाहन जेसीबी चालकाला केले. मात्र जेसीबी चालकाने त्यांच्यावर जेसीबीच्या पंज्याने हल्ला चढविला. तहसीलदारांनी त्यातून स्वतःचा बचाव केला. त्यानंतर जेसीपी चालकाने तिथून जेसीपीसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तहसीलदारांनी त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला असता जेसीबी चालकाने पुन्हा त्यांच्यावर जेसीबीच्या पंज्याने जीवघेणा हल्ला केला.

Bhandara Sand Mafiya
कर्जतमध्ये पोलिसच निघाला वाळू तस्कर

आपल्या वर दोनदा झालेल्या जीवघेणा हल्ल्यामुळे तहसीलदारांनी स्वरक्षणार्थ त्यांच्याकडील रिव्हॉल्वरने हवेत दोनदा गोळीबार केला. गोळीबार होताच जेसीबी चालक घाबरून जेसीबी तिथेच सोडून पळून गेला. लागलीच या संपूर्ण घटनेची माहिती तहसीलदारांनी मोहाडी पोलिसांना दिल्यानंतर मोहाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जेसीपी आणि टीप्पर ताब्यात घेतले. मोहाडी तहसीलदार दीपक कारंडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जेसीबी चालक, मालक, तसेच टिप्पर चालक आणि मालक यांच्याविरुद्ध कलम ३५३, ३७९ नुसार गुन्हा केला आहे. सध्या जेसीपी चालकाला अटक करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यामध्ये दोषी आढळल्यास इतरही लोकांवर गुन्हा नोंद करून अटक केली जाईल, असे पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी सांगितले.

दरम्यान भंडारा उपविभागीय अधिकारी यांना वाळू तस्करांकडून मारहाण झाल्याचे प्रकरण ताजे असताना आता तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा वाळू तस्कराची मुजोरी समोर आली आहे. आता या प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू असली तरी पोलिसांच्या यादीत मुख्य सूत्रधाराचा समावेश आहे की नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे या घटनेचा मुख्य सूत्रधार जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचा खाजगी संघटनेचा कार्यकर्ता असल्याच्या आरोप होऊ लागला आहे. त्यामुळेच एका मोठ्या महसूल अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्याइतपत मजल वाळू तस्करांची झालेली दिसत आहे. इतके मोठे रेकेट जिल्ह्यात सुरू असताना राज्याचे गृहमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यापुढे वाळू तस्करांचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे आता तरी वाळू तस्करांवर मोक्का लागेल का, हा प्रश्न जिल्हावासी प्रशासनाला विचारत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com