सुनेने चोरलेल्या रिव्हॉल्वने गोळ्या झाडून केली सासूची हत्या...

सेवानिवृत्त जेलरच्या घरून चोरी गेलेल्या रिव्हाल्व्हरच्या गोळीने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आर्णीतील मुबारकनगरात घडली.
Murder, Revolver
Murder, Revolver Sarkarnama

आर्णी (जि. यवतमाळ) : तीन दिवसांपूर्वी शेजारी राहात असलेल्या सेवानिवृत्त जेलरच्या घरून चोरी गेलेल्या रिव्हाल्व्हरच्या (Revolver) गोळीने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आर्णीतील मुबारकनगरात घडली. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. चौकशीअंती सुनेनेच गोळी झाडून सासूची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

आशा किसनराव पोराजवार (वय60) असे मृत महिलेचे नाव आहे. सकाळी यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या आर्णीतील मुबारकनगरमधील आशा पोराजवार या रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्याने त्यांना उपचारासाठी आर्णीतील रुग्णालयात नेले. मात्र, मृत्यू झाल्याने शवविच्छेदनादरम्यान महिलेच्या डोक्यातून बंदुकीची गोळी निघाली. या घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलिसांनी (Police) तत्काळ घटनास्थळ गाठले. किचन रुममधून रिव्हॉल्व्हर व दोन निकामी काडतूस तर पाच जिवंत काडतूस जप्त केल्या. मात्र, आशा पोराजवार यांच्यावर गोळी झाडणारा आरोपी कोण, हे कोडे काही सुटले नाही.

महिलेवर ज्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली गेली. ती गोळी सेवानिवृत्त सैनिक प्रभू गव्हाणकर यांच्या चोरी गेलेल्या रिव्हॉल्व्हरमधील आहे, हे तपास अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. शुक्रवारी रिव्हॉल्व्हर व सात जिवंत काडतूस चोरीला गेले होते. गव्हाणकर यांच्या घरासमोरच मृत महिलेचे घर आहे. ही रिव्हॉल्व्हर कुणी चोरली, ही बाब उघडकीस आली नाही. घटनास्थळावर दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिलखेकेकर, ठाणेदार पिंताबर जाधव, सहायक पोलीस निरिक्षक नागेश जायले, पोलिस उपनिरिक्षक किशोर खंदार, योगेश सुकलवार, विजय चव्हाण, मनोज चव्हाण, मिथुन जाधव, राजेद्र सरदारकर, मारोती मदने, ठसे तज्ज्ञ पीएसआय, सुनील काबंळे, अमित मेश्राम यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोहोचले होते व त्यांनी तपास सुरू केला.

Murder, Revolver
यवतमाळ येथील ‘त्या’ घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी घेतली दखल...

दिराने दिली वहीणीच्या विरोधात तक्रार..

घरात वहिनी व आई यांच्यात नेहमीच लहान-सहान कारणातून वाद होत होते. त्यामुळे वहिनीने गोळी झाडून आईचा खून केला, असा संशय महेश पोराजवार याने आर्णी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून व्यक्त केला. रिव्हॉल्व्हर चोरीला गेली, त्यावेळीही वहिनीकडे याबाबत विचारणा केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. त्यानंतर मंगेश किसन पोरजवार यांनी त्यांची वहिणी सरोज उर्फ बबी अरविंद पोरजवार यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर तिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सरोजला ताब्यात घेतले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com