APMC Darwha and Arni
APMC Darwha and ArniSarkarnama

Darwha - Arni APMC Result: दारव्ह्यात संजय राठोड, तर आर्णीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व !

Sanjay Ratod News: संजय राठोड यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Yavatmal District's Bazar Samiti Election Results: येथील बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने १८ पैकी १६ जागा जिंकून सत्ता मिळविली, तर महाविकास आघाडीला केवळ दोन जागा मिळविता आल्या. पालकमंत्री संजय राठोड यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांना आपली सत्ता राखण्यात यश मिळाले. (Sanjay Rathod succeeded in maintaining his power)

बाजार समितीच्या निवडणुकीत नामनिर्देशन दाखल झाल्यानंतर पॅनल ठरविताना जागा वाटपावरून महायुतीची चर्चा फिसकटली. त्यामुळे भाजपच्या सर्व सहाही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडीत थेट लढत झाली. प्रतिस्पर्धींनी प्रचारात चांगली ताकद लावली. गावागावांत प्रचार, बैठका, मोठ्या सभा झाल्या. पालकमंत्री संजय राठोड, माणिकराव ठाकरे, संजय देशमुख, वसंत घुईखेडकर आदी मैदानात उतरले.

मतदानाच्या दिवशीही पालकमंत्री राठोड, संजय देशमुख, वसंत घुईखेडकर, राहुल ठाकरे हजर झाले. या निवडणुकीत ग्रामपंचायत गट ४९५ पैकी ४८७, सहकारी संस्था ४४८ पैकी ४४३, व्यापारी-अडते ८२ पैकी पूर्ण ८२ व हमाल-मापारी गट ८९ पैकी ८२ याप्रमाणे ९८ टक्के मतदान झाले. निकालानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

विजयी झालेले उमेदवार..

सहकारी संस्था (सर्व सेना) सुशांत इंगोले, गोविंद जाधव, मारुती जावरे, प्रकाश दुर्गे, देवराव पवार, सुभाष पवार, शंकर भोंडे, सुभाष राठोड, विलास खेडकर, नानीबाई गावंडे, सुलोचना चव्हाण. ग्रामपंचायत गट सर्व सेना) आकाश ठोकळ, रामा राठोड, विजय तायडे, प्रकाश राठोड. व्यापारी अडते (मविआ) सुभाष राठी, लक्ष्मीकांत ठाकरे, हमाल मापारी (सेना) प्रकाश उरकुडे.

APMC Darwha and Arni
Maregaon APMC Result : मारेगावात काॅंग्रेस-शिवसेनेने (ठाकरे) एकत्र येत केला भाजपचा पराभव !

आर्णी बाजार समितीवर राष्ट्रवादी व काँग्रेस युतीचे वर्चस्व..

आर्णी येथील बाजार समितीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे १० व शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सहा, तर दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. बाजार समितीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युतीने १० संचालक निवडून आणून आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

या निवडणुकीत १८ संचालकांसाठी ५८ उमेदवार रिंगणात होते. ३० एप्रिलला निवडणूक व त्याचदिवशी मतमोजणी झाली. या निवडणुकीत १४२० मतदारांपैकी १३८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९७.६७ टक्के मतदान झाले. सहकारी संस्था मतदारसंघात ५२६ मतदारांपैकी ५१७, ग्रामपंचायत मतदारसंघात ६४० पैकी ६१९, हमाल, मापारी मतदारसंघात १८० पैकी १७७, व्यापारी, अडते मतदार संघात ७४ पैकी पूर्ण ७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

APMC Darwha and Arni
Buldhana District APMC: बाजार समित्यांमध्ये आघाडीचा डंका अन् सत्ताधाऱ्यांना धोक्याची घंटा !

या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित शेतकरी विकास आघाडीचे १० उमेदवार निवडून आलेत. यामध्ये राजेंद्र पाटील, अनिल आडे, उमेश कोठारी, राजेश बुटले, परशुराम राठोड, शीतल चौधरी, उमेश ठाकरे, प्रदीप मसराम, दीपक बुटले, शहा गफूर शेख हे उमेदवार निवडून आलेत, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणीत शेतकरी परिवर्तन महाविकास आघाडी पॅनलचे सहा उमेदवार निवडून आलेत. यात तुकाराम आडे, प्रवीण शिंदे, रजनी खंदार, गणेश राठोड, उज्ज्वल मोरे, आकाश वाघमारे हे उमेदवार निवडून आले.

अपक्ष म्हणून अजय गादेवार व संतोष चव्हाण हे निवडून आले. (BJP) भाजप-शिवसेना (Shivsena) - मनसेप्रणित (MNS) शेतकरी न्यायहक्क आघाडी पॅनलला एकही उमेदवार निवडून आणण्यात यश आले नाही. बाजार समितीची निवडणूक (APMC Election) दुहेरी व अतिशय चुरशीची झाली. मतमोजणी केंद्रावर मतमोजणी शांततेत पार पडली.

APMC Darwha and Arni
Telhara APMC Election Result : तेल्हाऱ्यात वंचित आणि शिवसेनेने (ठाकरे गट) दिली भाजपला मात !

ईश्वरचिठ्ठीने एक उमेदवार जाहीर..

दीपक बुटले व दिनेश ठाकरे या दोन्ही उमेदवारांना सारखीच मते पडली. त्यामुळे चिमुकल्या खियांश नवल झंवर या मुलाच्या हस्ते ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. या ईश्वर चिठ्ठीत दीपक बुटले यांना विजयी घोषित करण्यात आले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com