दिव्याखाली अंधार, शासकीय कार्यालयांतील कोरोना प्रतिबंधात्मक व्यवस्था गायब...

ओमिक्रॉनचे संकट गडद होऊ लागले आहे. त्यात कोरोना (Corona) नियमांचे पालन करण्याचे उपदेश देणाऱ्या शासकीय कार्यालयातच त्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे.
Corona
CoronaSarkarnama

नागपूर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी पहिली ते आठव्या वर्गांतील विद्यार्थ्यांची शाळा बंद केली आणि निर्बंध कठोर करीत असल्याची घोषणा केली. शासकीय कार्यालयांकडून याबाबतच्या सूचना जनतेला दिल्या जातात. पण शासकीय कार्यालयांमधीलच कोरोना (Corona) प्रतिबंधक व्यवस्था गायब झाल्यामुळे ‘दिव्याखाली अंधार’, अशी स्थिती झाली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असताना ओमिक्रॉनचे संकटही गडद होऊ लागले आहे. त्यात कोरोना नियमांचे पालन करण्याचे उपदेश देणाऱ्या शासकीय कार्यालयातच त्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. अनेक कार्यालयातील प्रतिबंधात्मक व्यवस्थाच गायब असून काही ठिकाणी ती असून नसल्यासारखी असल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालय आदी शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच एक कर्मचारी सॅनिटायझर व थर्मल स्कॅनर घेऊन ये-जा करणाऱ्या अभ्यागतांचे तापमान मोजण्यासोबतच हातावर सॅनिटायझर दिल्यानंतर कार्यालयात प्रवेश देत होते. ही परिस्थिती शहरातील जवळपास सर्वच कार्यालयात होती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप कमी झाल्यानंतर अनेक कार्यालयातील प्रवेश द्वारावरून ही व्यवस्था कमी झाली. आता पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शासनाकडून लॉकडाऊनची भाषा होत असून निर्बंध अधिक कठोर करण्यात आले. लग्न समारंभ, अंत्यविधी इतर कार्यक्रमातील उपस्थितांच्या संख्येवर बंधने आणली. त्याप्रमाणे प्रत्येक दुकान, खासगी कार्यालय, आस्थापना यांनाही आपल्या दुकानात कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे निर्देश जारी केले. परंतु या आदेशाची जर त्यांच्याकडून पायमल्ली झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला. मात्र, शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागत येताना त्यांच्यासाठी कुठलेही सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर मशीन घेऊन कर्मचारी नसल्याने ते अभ्यागत थेट कार्यालयांमध्ये प्रवेश घेत आहे. अनेक अभ्यागत हे मास्कही वापरत नसल्याचे चित्र आहे.

Corona
घरात कोरोना आलाय हा बाहेर हिंडतोय! ममतादीदी सख्ख्या भावावर संतापल्या

जि.प.च्या प्रवेशद्वारावरून कर्मचारी गायब

ग्रामीण भागातील नागरिकांची कामानिमित्त जिल्हा परिषदेत ये-जा असते. त्यामुळे सीईओ योगेश कुंभेजकर यांनी कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता जि.प.च्या प्रवेशद्वारावर काही दिवसांपूर्वीपर्यंत एक कर्मचारी बसविला होता. अभ्यागतांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्कॅनर व सॅनिटायझर घेऊन बसविण्याची सोय केली होती. परंतु आता ही व्यवस्था नाही. शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात सॅनिटायझरचा उपयोग होत नसल्याचे सांगण्यात येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com