Ambadas Danve On Viral Video: विधानपरिषदेत दानवेंचा धक्कादायक खुलासा; ३२ देशांनी पाहिला, ‘तो’ व्हिडिओ !

MLA : त्या आमदाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाला.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama

Sheetal Mhatre Viral Video: शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे की नाही आणि त्यासंबंधात इतर मुद्द्यांनी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. आज विधानपरिषदेच्या सभागृहातही हा मुद्दा चांगलाच गाजला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात धक्कादायक खुलासा केला.

अंबादास दानवे म्हणाले, काल सत्ताधारी पक्षाचे आमदार अडचणीत आले. त्या आमदाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाला. एका आमदाराच्या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ डिलीट झाला. त्याचा तपास झाला नाही. यू ट्यूबवर ३२ देशांतील ३० लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला. या प्रकरणात जे सहभागी नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. पोलिस विनाकारण दुसऱ्यावर कारवाई करतात.

व्हिडिओ ओरीजनल आहे की डुप्लिकेट याचाही तपास झाला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी असे घडत असेल तर गुन्हे दाखल झाले पाहिजे. सरकार गुन्हेगारांच्या बाजूने आहे का, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. आमदाराच्या फेसबुक पेजचा तपास सरकारने केला पाहिजे. यासंदर्भात पोलिस आयुक्तांशी मी बोललो असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

एका नेत्याचा मुलगा भर रस्त्यात दुचाकीवर स्टंट करून पिस्तूल काढतो. ही गंभीर बाब आहे. पिस्तुलामधून काडतूस निघतात. एका नेत्याची पिस्तूल दुसऱ्याच्या हाती जाते, हा गुन्हा नाही का? दुसरा गोळी झाडत असेल तर ज्याची पिस्तूल आहे, त्याचाही यात दोष आहे, असे अंबादास दानवे म्हणाले. औरंगाबाद या नावासाठी काही लोक आंदोलन करत होते. औरंगजेबाचे फोटो झळकावले गेले. पण काहीच कारवाई झाली नाही. दीड हजार लोकांचा कॅंडल मार्च विनापरवानगी काढला, तरीही कारवाई नाही. पोलिसांना धमकावण्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे सरकारची भूमिका संशयास्पद आहे, असे दानवे म्हणाले.

Ambadas Danve
Ambadas Danve News: वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार, दानवेंनी उठवला होता आवाज !

अर्थमंत्र्यांनी (Finance Minister) सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे गाजर, भोपळा आहे. स्वामिनाथन आयोग लागू करण्याची घोषणा सरकारने केली होती, पण झाला नाही. उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ म्हणाले होते, पण दिला नाही. ऑनलाइन सातबारा वर २०२१, २०२२ नंतर २०२३ असे येते. यामध्ये फक्त २०२२-२३ असे दोन वर्ष आले पाहिजे. सॉफ्टवेअर शेतकऱ्यांची माहिती स्वीकारत नाही. प्रति हेक्टरी ८ क्विंटल हरभरा घेतला जात आहे, तो कमीत कमी १५ क्विंटल घेतला पाहिजे, आदी मागण्या दानवेंनी केल्या.

Ambadas Danve
Ambadas Danve : पालकमंत्र्यांच्या मतदारसंघाला अर्थसंकल्पात ठेंगा, दानवे म्हणाले, तुम्ही पैठणचे नाथ सोडले अन् ..

नल पोहोचतो, पण जल नाही..

अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत आनंदाचा शिधा दिला गेला. पण तो कुणी मागितला नव्हता. तर गुत्तेदारांचे पोट भरण्यासाठी ती योजना राबविली गेली. आता गुढीपाडवा आणि आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) जयंतीलासुद्धा देणार आहेत म्हणे. हे केल्यापेक्षा डीबीटीने थेट दिले पाहिजे. म्हणजे यंत्रणा गुंतणार नाही. पाणीपुरवठा जलजीवन योजना ही पंतप्रधानांची (Prime Minister) महत्वाकांक्षी योजना आहे. हर घर नल पोहोचतो, पण जल पोहोचत नाही.

केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम होते आहे. २२, ९८,००० पैकी फक्त ४,३८,००० जोडण्या झाल्या. त्यातही जल नाही. योजना मंजूर होऊनही कामे होत नाही. ग्रामपंचायतींना विश्‍वासात घेतले जात नाही. निविदा काढण्यापुरतेच काम सरकार करते की काय, असा सवाल अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अर्थसंकल्पावरील भाषणात सभागृहाला केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com