दादा म्हणाले; रजनीश सेठ स्पष्ट सांगतो, राजकीय दबावात काम करू नका...

पोलिस दलाला टोले लगावताना पोलिस विरोधकांच्या दबावात काम करतात, असे आरोप अप्रत्यक्षपणे पवारांनी (Ajit Pawar) केला. ते म्हणाले, प्रत्येक काम निष्पक्षपणे झाले पाहिजे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

नागपूर : सिव्हिल लाइन्समधील पोलिस भवनच्या उद्घाटन समारंभासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल नागपुरात आले होते. या मंचावरून त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले.

पोलिस (Police) दलाला टोले लगावताना पोलिस विरोधकांच्या दबावात काम करतात, असे आरोप अप्रत्यक्षपणे पवारांनी (Ajit Pawar) केला. ते म्हणाले, प्रत्येक काम निष्पक्षपणे झाले पाहिजे. रजनीश सेठ मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, काम करताना कोण सत्ताधारी पक्षाचा आहे, कोण विरोधी पक्षाचा आहे, याचा विचार करू नका. राज्यात (Maharashtra) हा सत्तेवर आहे, म्हणून याचे काम कर, तर केंद्रात तो सत्तेवर आहे, तर त्याचे काम केले पाहिजे, असा कुठलाही दबाव घेऊ नका. पोलिस दलाचे काम करताना कुठलाही राजकीय दबाव नसला पाहिजे.

राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगतो की, पोलिसांना पूर्णपणे योग्य तपास करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. आपण कुण्या राजकीय पक्षाशी नाही तर राज्यातल्या १२ कोटी जनतेशी बांधील आहोत. तुम्ही तुमचे काम नीट केले, तर लोक आमच्याकडे येणार नाहीत आणि अशीच कार्यपद्धती तुम्ही अवलंबिली पाहिजे. महाराष्ट्र पोलिसांचा नावलौकिक जगभरात आहे. महाराष्ट्र पोलिसांची परंपरा इतरांपेक्षा वेगळी आहे. देशातील क्रमांक १ चे दल आपले आहे आणि महाराष्ट्र पोलिसांनी वारंवार ते सिद्धही केले आहे. त्यामुळे आपण कोणत्याही दबावाला बळी न पडता काम केले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Ajit Pawar : कोरोनामध्ये धंदे बसले, नोकऱ्या गेल्या आणि यांना भोंगा आठवतोय...

रजनीश सेठ आणि दिलीपराव (गृहमंत्री दिलीप वळसे पाटील) जेव्हा केव्हा तुम्ही लोक माझ्याकडे येता, तेव्हा अर्थमंत्री म्हणून तुमच्या प्रत्येक कामांना ताबडतोब मंजुरी दिली जाते. आमच्या अनेक अडचणी बाजूला ठेवून तुमचे काम करतो. कारण पोलिसांचे काम केलेचे पाहिजे, या धोरणावर आम्ही चालतो. याची जाण ठेवत आपणही दबावाला, प्रलोभनांना बळी न पडता निष्पक्षपणे काम करा, असे खडे बोल अजित पवारांनी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in