काँग्रेसमधील राऊतही निशाण्यावर; पदाधिकाऱ्यांची नाराजी भोवणार?

राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता होती. मात्र, पदाधिकाऱ्यांना काहीच मिळले नाही, असा आरोप करण्यात आला आहे
Nitin Raut
Nitin RautSarkarnama

नागपूर : राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता होती. आघाडीमध्ये काँग्रेस (Congress) सत्तेत असतानाही कार्यकर्त्यांना काहीच मिळाले नाही. साधे दंडाधिकाऱ्यांचे पदही मिळाले नाही, असे सांगून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या कारभारावर टीका केली.

काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीची बैठक शनिवारी शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेत देवडिया भवन येथे पार पडली. या बैठकीत विवेक निकोसे यांनी काँग्रेसचे मंत्री कोणालाही भेटत नव्हते, असा आरोप केला. राज्यात सत्ता असल्याने पक्षाचा विस्तार आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्षाला मोठे करण्याची संधी उपलब्ध होती. मात्र, माजी पालकमंत्र्यांनी कोणालाच समित्या दिल्या नाहीत. पक्षाला सक्रिय करण्यासाठी काहीच केले नसल्याचा आरोप त्यांनी केला. किशोर गीद यांनी क्रियाशील कार्यकर्त्यांना वगळून निष्क्रिय कार्यकर्त्यांची जिल्हानियोजन, संजय गांधी, महावितरण समित्यांवर नियुक्त्या केल्याचेही सांगितले.

Nitin Raut
ठाकरेंच्या दौऱ्याला प्रतिसाद अन् मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये ; औरंगाबाद, नाशिकला येणार..

काँग्रेसने शहर अध्यक्ष म्हणून आपल्या नावाने पत्र दिले आहे. त्यामुळे सर्वांसोबत संवाद साधण्यासाठी शहर कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. आम्ही सत्तेत असताना पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची कामे झाली नाही. हे सत्य आहे, कोणालाही पदे देता आली नाही, याची खंत असल्याचे ठाकरे म्हणाले. नवीन कार्यकारिणीत सक्रिय व दमदार कामगिरी करणाऱ्यांना स्थान दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Nitin Raut
नाराज चंद्रकांत हंडोरे हे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार..? हंडोरे म्हणाले...

नागपूरचे (Nagpur) डीआरओ सुनील कुमार व एपीआरओ दिनेश कुमार काही दिवसातच सविस्तर अहवाल प्रदेश कॉंग्रेसला सादर करणार आहेत. त्यानंतर नवीन कार्यकारिणी जाहीर होणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. बैठकीला प्रा. दिनेश बानाबाकोडे, दीपक वानखेडे, गजराज हटेवार, बंडोपंत टेंभुर्णे, अण्णाजी राउत, विक्रम पलकुले, संजय भिलकर, जॉन थॉमस, संदेश सिंगलकर, वीना बेलगे, रमण पैगवार, विवेक निकोसे, आशिश दीक्षित, महिला अध्यक्ष नैश अली, डॉ. सुधीर आघाव, विलास भालेकर, किशोर उमाठे, दर्शनी धवड आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in