Bawankule : महाविकासच्या काळात पीक विम्यात भ्रष्टाचार; बावनकुळेंचा दावा...

Agriculture Minister : कृषिमंत्र्यांनी किंवा कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पीक विम्याचा आढावा घेतला नाही.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSakarnama

Mahavikas Aghadi Government : महाविकास आघाडी सरकारने विमा कंपन्यांना पैसे दिले, मात्र अडीच वर्षे कधीही आढावा घेतला नाही. कंपन्यांवर नियंत्रण नसल्याने पीक विमा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

आज सकाळी मुंबईला (Mumbai) जाण्यापूर्वी नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) पत्रकारांशी ते बोलत होते. पीक विमा कंपन्यांच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. आमदार बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या (Mahaikas Aghadi Government) काळात कृषिमंत्र्यांनी किंवा कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी पीक विम्याचा आढावा घेतला नाही.

खरिपाच्या आढावा बैठक सुद्धा त्या काळात झाल्या नाही. पीक विमा कंपन्या सरकारकडून पैसे घेत होत्या. मात्र खरोखर शेतकऱ्यांना त्यांनी परतावा दिला की नाही हे पाहण्याकडे कोणाचाही लक्ष नव्हते.. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. विमा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे खाल्ले. हे मागच्या मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांच्या प्रकरणात जो भ्रष्टाचार झाला आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

आदित्य ठाकरे खोटारडे..

आदित्य ठाकरे खोटे बोलत असल्याचे सांगून श्री बावनकुळे म्हणाले, वेदांता प्रकल्पाबाबतची माहिती अधिकारातच समोर आली आहे की मागच्या सरकारने कुठेही वेदांताला जागा दिलेली नाही. त्यासंदर्भात कुठेही बैठक घेतली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे वेदांता प्रकल्प गेला. उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयातच येत नव्हते. मग कंपनीच्या अधिकाऱ्यांशी कुणी चर्चा करावी, वेदांतासाठी कुठलेही शासकीय जीआर काढले नाही. जमीन दिली नाही. आता ते खोटारडेपणाचा कळस करत आहेत.

Chandrashekhar Bawankule
Bawankule : बावनकुळे म्हणाले, आदित्य म्हणजे सोन्याच्या चमचाने दूध प्यालेलं बाळ...

राज्यपालांचा विषय आमच्या अधिकाराबाहेरचा..

उदयनराजे असो किंवा आम्ही. आमची सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही. मात्र, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना ठेवायचे की नाही हे आमच्या अधिकार क्षेत्रात नाही. त्या दिवशी राज्यपालांची चूक झाली आहे. त्यांना ठेवायचे की नाही ठेवायचे हे आमचे अधिकार क्षेत्र नसल्याचे श्री बावनकुळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in