संजय गायकवाडांचे पुन्हा वाद्‌ग्रस्त विधान; शिवसेनेला आई म्हणता ना?; मग तिला....

निवडणूक आयोगाने जो काही निर्णय घेतला आहे, तो कायद्याच्या चाकोरीत घेतला आहे. जे काही परिणाम होणार आहेत, ते आता उद्धव ठाकरे गटाला भोगावेच लागणार आहेत.
Sanjay Gaikwad
Sanjay Gaikwad Sarkarnama

बुलडाणा : निवडणूक आयोगाकडून (Election commission) धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यानंतर शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटाकडून (Eknath shinde) एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप होत आहे. मात्र, शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. ज्या शिवसेनेला तुम्ही आई म्हणता, आम्हीही आई मानतो. मग, ती तुम्ही काँग्रेसच्या (Congress) दावणीला कशी बांधता? असे म्हणत अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरत गायकवाड यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. (Controversial statement of MLA Sanjay Gaikwad again while criticizing Thackeray group)

आमदार संजय गायकवाड म्हणाले की, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याचा निर्णय त्यांच्या अधिकारात घेतला आहे. पण, त्यावरून जे आरोप चालले आहेत, त्यात कोणी म्हणतंय ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे. कुणी म्हणतंय आपल्या आईला बाजारात विकलं. पण हे चाळीस आमदार दुखावले आहेत. तुमच्या परिवारातील तुमची सून, तुमचा पोरगा, तुमचा नातू चालला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा सेवक थापा चाललाय. मग या लोकांनी किती खोकी घेतली आहेत.

Sanjay Gaikwad
शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना सुचविले शिवसेनेचे नवे नाव!

दुखावलेल्या शिवसेनेच्या ४० आमदारांना तुम्ही परत आणलं असतं, तर आज ही वेळ आली असती का? याचं आत्मपरीक्षण ठाकरे गटाच्या लोकांनी करायला पाहिजे. ज्या शिवसेनेला तुम्ही आई म्हणता, आम्हीपण मानतो. मग ती तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधता, हे कितपत योग्य आहे,असा सवालही आमदार गायकवाड यांनी उपस्थित केला.

Sanjay Gaikwad
शिवसेना संपवायला पवारच जबाबदार; मोठे लोक कुठं काय गेम करतील, सांगता येत नाही : शिवतारेंचा आरोप

निवडणूक आयोगाने जो काही निर्णय घेतला आहे, तो कायद्याच्या चाकोरीत घेतला आहे. जे काही परिणाम होणार आहेत, ते आता उद्धव ठाकरे गटाला भोगावेच लागणार आहेत. त्यांच्या चुकांचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील, असा इशाराही आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com