आंदोलन सुरुच ठेवा.. नवनीत राणांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

'सरकारला तुमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील, संप मागे घेऊ नका'
आंदोलन सुरुच ठेवा.. नवनीत राणांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

अमरावती : एसटी महामंडळाचे (ST Mahaamandal) राज्य सरकारमध्ये (state Government0 विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहे. त्यामुळे राज्यातील एसटीची सेवा थांबली आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढू पण कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी वांरवार विनंती केली. मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

यावर अमरावतीच्या (Amaravati) खासदार नवनीत राणा (MP Navnit Rana) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परिवहनमंत्री यांनी दोन-तीन दिवसात यावर तोडगा काढावा आणि एसटी कर्मचाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू राहू द्यावे, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. मागील दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत, त्यांच्या मागण्या सरकारने मंजूर करणे गरजेचे आहे. तसेच आतापर्यंत चाळीसपेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे सरकारने त्यांच्याही कुटुंबांना मदत करावी, अशी मागणीही नवनीत राणा यांनी केली होती

आंदोलन सुरुच ठेवा.. नवनीत राणांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
एसटी संपाबाबत शरद पवार चांगला निर्णय घेतील

दरम्यान, दोन दिवसांपुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एक गुप्त बैठक झाली होती. या बैठकीनंतर एसटी कामगारांच्या संपावर तोडगा निघेल अशी अपेक्षा नवनीत राणा यांनी व्यक्त केली होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातले, त्यामुळे आता एसटी संपाच्या समस्येवर एक आशेचा किरण दिसू लागला आहे, आता लवकरच एसटीच्या संपावर तोडगा निघेल, आता लवकरच चांगला संदेश मिळेल, अशी आशा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी परिवहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या संपावर तोडगा काढण्यात अपयशी ठरले असल्याची टीकाही राणा यांनी केली होती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in