रणजीत देशमुख यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त उद्या काँग्रेसचा नवसंकल्प मेळावा...

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजीतबाबू देशमुख (Ranjeet Deshmukh) यांनी २९ मे २०२१ रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. कोरोनाच्या संकटामुळे आयोजन समितीला कुठलाही कार्यक्रम घेता आला नव्हता.
रणजीत देशमुख यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त उद्या काँग्रेसचा नवसंकल्प मेळावा...
Ranjeet DeshmukhSarkarnama

नागपूर : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते रणजीत देशमुख यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे निमित्त साधून उद्या रविवारी विदर्भातील (Vidarbha) नेते व कार्यकर्त्यांचा नवसंकल्प व ऐक्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा मेळावा होईल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राहतील. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. रणजीतबाबू देशमुख (Ranjeet Deshmukh) यांनी २९ मे २०२१ रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. कोरोनाच्या संकटामुळे आयोजन समितीला कुठलाही कार्यक्रम घेता आला नव्हता. आता सर्व निर्बंध शिथिल झाल्यामुळे कार्यकर्ते, समर्थक आणि चाहत्यांच्या आग्रहाखातर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या अमृतमहोत्सवानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणणे, उत्साह वाढविणे आणि सर्वांनी एकत्र यावे, या उद्देशाने हा कार्यक्रम होत असल्याचे प्रकाश मुगदीया, आर. एम. खान, विलास भालेराव, राजू भागवत, शाबाद खान, ए.के. पांडे, प्रा. डॉ. विजय धोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रविवारी शहरात भरगच्च कार्यक्रम आहेत. सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी आहे. त्यामुळे या नवसंकल्प मेळाव्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. सर्व कॉंग्रेसजणांनी एकत्र येण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. कॉंग्रेसचे सर्व नेते एकत्र आल्यास कोणतीही निवडणूक जिंकणे कॉंग्रेससाठी अवघड नाही. त्यामुळे हा मेळावा महत्वाचा ठरणार आहे.

Ranjeet Deshmukh
आमदाराकडेच सहावे पद येताच काॅंग्रेस नेतेही चक्रावले : नाना पटोलेंनी घेतली अॅक्शन

शनिवारी आणि रविवारी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्यावतीने दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या शिबिरात देशभरातील काँग्रेस नेते सहभागी होणार आहेत. यात आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह केंद्रातील बड्या नेत्यांचा समावेश आहे. ही सर्व नेतेमंडळीही नवसंकल्प शिबिराला हजेरी लावतील, असे सांगण्यात येत आहे. रणजीत देशमुख यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित हा नवसंकल्प मेळावा यशस्वी झाल्यास कॉंग्रेसचे अच्छे दिने जास्त दूर नाहीत, असे राजकीय जाणकार सांगतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in