Congress's election preparations : काँग्रेसचे सोशल मीडिया वॉरियर्स सज्ज, दुही माजवणाऱ्या नीतीचा पराभव होणार !

Social media warriors : जशास तसे उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे सोशल मीडिया वॉरियर्स सज्ज झाले आहे.
Congress's Social Media Workshop
Congress's Social Media WorkshopSarkarnama

Nagpur Political News : २०१४ साली भाजपने सोशल मिडियाचा पुरेपूर वापर करत देशात सत्ता आणली. २०१४ ते २०१९ या काळात याच मिडियाचा वापर करीत यंत्रणा भक्कम केली. आता कॉंग्रेसने सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी करत असताना सोशल मिडियाच्या वापरावर कॉंग्रेस भर देणार असल्याचे अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आलोक शर्मा म्हणाले. (BJP's divisive policy will definitely be defeated)

काँग्रेसने सोशल मीडियाला अतिशय गांभीर्याने घेत पुढील लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. भाजपच्या खोट्या, अपप्रचारास जशास तसे उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे सोशल मीडिया वॉरियर्स सज्ज झाले आहे. भाजपच्या दुही माजवणाऱ्या नीतीचा नक्कीच पराभव होईल, यात काँग्रेसच्या सोशल मीडियाचा महत्त्वाचा वाटा असेल, असे मत शर्मा यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मिडिया विभागातर्फे वनामती येथे काल (ता. २७) पूर्व व पश्चिम विदर्भातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री आमदार सुनील केदार, कॉंग्रेस शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडिया आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवार, राष्ट्रीय समन्वयक नितीन अग्रवाल, आकाश तायवाडे आदी उपस्थित होते.

यावेळी शर्मा यांनी काँग्रेसच्या (Congress) आत्तापर्यंतच्या सरकारांच्या कामगिरीबद्दल माहिती देऊन मोदी सरकारच्या (Modi Government) लोकशाही विरोधी धोरणावर टीका केली. प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी प्रास्ताविक करताना सोशल मीडियावरील प्रशिक्षणावर भर देत असल्याचे नमूद करीत संपूर्ण राज्यभर पक्षाची प्रशिक्षित टीम कार्यरत असल्याचे सांगितले. विलास मुत्तेमवार, सुनील केदार, अतुल लोंढे यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Congress's Social Media Workshop
Congress Jansamvad Yatra : काँग्रेसची राज्यात तीन सप्टेंबरपासून जनसंवाद यात्रा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, फेसबुक, आर्टिफिशियल इंटलीजन्स आदी विषयांवर बिलाल अहमद, जायद खान, डॉ. प्रवीण सरपाते यांनी प्रशिक्षण दिले. चैतन्य पुरंदरे यांनी संचालन केले. प्रशिक्षण शिबिरास पूर्व व पश्चिम विदर्भातून (Vidarbha) सुमारे दीडशे कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सोशल मीडिया विभागातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in