काँग्रेस कार्यकर्ते व पोलिसांत धक्काबुक्की, बंटी शेळके जखमी...

आक्रमक कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्ष उडाला. युवक काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे कार्यकर्ते आणखीनच चिडले.
काँग्रेस कार्यकर्ते व पोलिसांत धक्काबुक्की, बंटी शेळके जखमी...
Congress Agitation Sarkarnama

नागपूर : कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात कॉंग्रेसने काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आक्रमक कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्ष उडाला. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे कार्यकर्ते आणखीनच चिडले.

यापूर्वी ईडीच्या कार्यालयासमोर (ED) करण्यात आलेल्या आंदोलनात कॉंग्रेसचे (Congress) माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांची जीभ घसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरले. ते प्रकरण अजून धुमसत असताना कालच्या आंदोलनात हा प्रकार घडला. ईडीच्या माध्यमातून राहुल गांधी यांना त्रास दिला जात असल्याने काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात चांगलीच धक्काबुक्की झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून कार्यकर्त्यांना पांगविले तर बॅरिकेड्‍सवरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने बंटी शेळके यांच्या डोक्याला चांगलाच मार लागला.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. तीन दिवसांपासून राहुल गांधी यांना रोज कार्यालयात चौकशीच्या नावाने बसवून ठेवले जात आहे. भाजपच्या इशाऱ्यावरून अधिकारी त्यांचा मानसिक छळ करीत असल्याने काँग्रेसच्यावतीने सर्व प्रथम ईडी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यकर्ते शिरू नये, याकरिता पोलिसांनी बॅरिकेड्‍स लावले होते. उत्साहात असलेल्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्‍स तोडण्याचा प्रयत्न केला. बंटी शेळके बॅरिकेड्सवर चढून आत जाण्याचा प्रयत्न करीत होते. एका बाजूने पोलिस त्यांना रोखत होते तर दुसऱ्या बाजूने कार्यकर्ते त्यांना आत ढकलत होते. त्यात बंटी शेळके डोक्याच्या भारावर जमिनीवर आदळले. त्यांना मार लागल्याने लगेच मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले.

Congress Agitation
भंडारा-गोंदिया झेडपी सत्तास्थापनेचे पडसाद नागपूर महानगरपालिकेवर उमटणार!

कार्यकर्ते ऐकत नसल्याचे बघून पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. आंदोलकांची धरपकड केली. त्यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झकपक झाली. आमदार विकास ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, महिलाध्यक्ष नॅश अली, नाना गावंडे, आमदार अभिजित वंजारी, रश्मी बर्वे, विशाल मुत्तेमवार, सुरेश भोयर, शकुर नागानी, कुंदा राऊत, अवन्तिका लेकुरवाळे, मनोहर कुंभारे, प्रकाश वसू, अनिल रॉय, युवक काँग्रेस, महिला काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

आम्हालाही जेलमध्ये टाका..

राहुल गांधी यांना रोज ईडीच्या कार्यालयात बसवून ठेवले जात आहे. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. राहुल गांधी यांना जेलमध्ये टाकणार असाल, तर आम्हीसुद्धा जेलमध्ये जाण्यास तयार आहोत. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाका, अशी मागणी यावेळी आमदार विकास ठाकरे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in