तिवसा नगरपंचयातीवर काँग्रेसची एकहाती सत्ता; यशोमती ठाकूर यांनी राखला गड

तर भातकुली नगरपंचायतीवर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने आपले वर्चस्व राखत ९ जागांवर आघाडी मिळवली आहे.
Tivasa Nagarpanchayat, Amaravati
Tivasa Nagarpanchayat, Amaravati Sarkarnama

अमरावती : अमरावती (Amaravati) जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणूकीचे (Nagar Panchayat Election) निकाल हाती आले असून काँग्रेसने (Congress) आपले वर्चस्व कायम राखत एकहाती सत्ता मिळवली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी याठिकाणी आपला गड राखला आहे. तिवसा नगर पंचायतीत एकूण १७ जागांपैकी काँग्रेसने १२ जागांवर विजय मिळवला असून शिवसेनेने ४ तर वंचित बहुजन आघाडीला ०१ जागा मिळाली असून भाजपला अद्याप खातेही उघडता आलेले नाही. विशेष म्हणजे यावेळी वंचित बहुजन आघाडीने याठिकाणी पहिल्यांदाच आपले खाते उघडले आहे. (Amaravati Nagar Panchayat Election Results Live Updates)

Tivasa Nagarpanchayat, Amaravati
नंदूरबारमध्ये के.सी.पाडवींना धक्का; शिवसेनेने फडकवला भगवा

तर भातकुली नगरपंचायतीवर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने आपले वर्चस्व राखत ९ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर शिवसेनेला तीन जागा, भाजपला २ आणि कॉंग्रेसने १ जागेवर तर अपक्षने २ जागांवर आपला विजय निश्चित केला आहे.

भातकुली नगरपंचायत निवडणूकीत शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्षामध्ये थेट लढत झाली. पण, याठिकाणी शिवसेनेकडे कोणताही भक्कम उमेदवार नसल्याने शिवसेनेला वर्चस्व मिळवता आले नाही. भातकुली हा आमदार रवी राणा यांचां बालेकिल्ला मानला जातो. निवडणूकीसाठी त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनीही यांच्यासोबत प्रचार केला होता. याचे फळ म्हणजे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने ९ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले.

Tivasa Nagarpanchayat, Amaravati
कारंजा नगरपंचायतीत भाजपच्या चार उमेदवारांनी मारली बाजी

तिवसा आणि भातकुली नगरपंचायतींबरोबरच कारंजा नगरपंचायतीमध्ये भाजपच्या 4 उमेदवार विजयी झाले आहेत. 1)मंदा खंडारे विजयी 8 मताने, 2)रुखम खंडारे 164 मताने विजयी, 3) रमा दुर्गे 308 मताने विजयी, 4 ) राहुल जोरे 68 मताने विजयी झाले आहेत.

तसेच, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी ( Bodwad Nagar Panchayat election) झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे. एकुण १७ जागासाठी मतदान झाले आहे. यापैकी तीन जागांचे निकाल लागले असून यात राष्ट्रवादीचा दोन, तर शिवसेनेनं एका जागेवर विजय मिळविला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com