OBC : केंद्रात सत्ता आल्यास कॉंग्रेस करणार जातिनिहाय जनगणना...

Economic Census : भाजप सरकारने यात चुका असल्याचे कारण सांगत अहवाल प्रसिद्ध केला नाही.
Congress OBC Division
Congress OBC DivisionSarkarnama

News of OBC Division : माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात २०११ मध्ये आमच्या पक्षाने सामाजिक व आर्थिक जनगणना केली. त्याचे काम २०१६ पर्यंत चालले. परंतु भाजप सरकारने यात चुका असल्याचे कारण सांगत अहवाल प्रसिद्ध केला नाही. त्यामुळे २०२४ मध्ये केंद्रात कॉंग्रेस पक्षाची सत्ता आल्यास ओबीसीसह सर्व प्रवर्गांची जातिनिहाय जनगणना करण्यात येईल, असे प्रतिपादन कॉंग्रेस ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजय सिंह (Ajay Singh) यांनी केले.

पूर्व विदर्भ कॉंग्रेस ओबीसी (OBC) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन जवाहर वसतिगृह येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. कॉंग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, माजी मंत्री सुनील केदार, (Sunil Kedar) आमदार अभिजित वंजारी, आमदार विकास ठाकरे, (Vikas Thakre) जि.प. सभापती अंवतिका लेकुळवारे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, (Atul Londhe) कॉंग्रेस ओबीसी विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र लांडे उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना मंडल आयोगाचे अध्यक्ष व ओबीसी मसीहा बी.पी. मंडल आणि महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, असे अजयसिंह यादव म्हणाले. यावेळी केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावा, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती आरक्षण देण्यात यावे, भारत सरकार मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती १०० टक्के देण्यात यावी, यांसह इतर ठराव पारित करण्यात आले.

कर्तव्य म्हणून एकत्र या - सुनील केदार

सत्तेत असलेल्या लोकांचा पहिल्या दिवसापासून एकमेव अजेंडा आहे. तो म्हणजे आपल्या पुढील लोकांमध्ये जेवढी फुट पाडता येईल तेवढी फुट पाडायची आणि स्वतःच वर्चस्व स्थापन करायचं. आता सत्तेत असलेल्यांनी सर्वत्र फुट पाडली. ओबीसी प्रवर्गात काहीच जातींचा समावेश नसून राज्य यादीनुसार तीनशेच्यावर जातींचा समावेश आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अधिकार म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे, असे माजी मंत्री आमदार सुनील केदार म्हणाले.

Congress OBC Division
Congress : शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी काॅंग्रेस न्यायालयीन लढाईच्या तयारीत ..

स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसीला मिळालेले आरक्षण हे तात्पुरते आहे. या आरक्षणाचा बट्याबोळ भाजपने केला. महाराष्ट्रामध्ये ओबीसींवर होत असलेल्या अन्यायावर कॉग्रेस सातत्याने आवाज उठवत आहे. लाखो लोक पहाटे सहा वाजता रस्त्यावर येऊन राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला जुळतात. त्यांच्या यात्रेला वाढता प्रतिसाद बघून यात्रेला घाबरले आहेत. कोरोनाची लाट येत आहे, असे भासवून केंद्र सरकार यात्रा थांबविण्यासाठी पत्र पाठवत आहेत, हे एक षड्यंत्र आहे, असे कॉंग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com