Congress : अंतर्गत कुरबुरी तर सर्वच पक्षांमध्ये असतात, लवकरच निकाली निघेल ‘हा’प्रश्‍न !

Sandhya Sawwalakhe : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काही नेत्यांनी जोरदार मोहीम उघडली आहे.
Sandhya Sawwalakhe, Congress.
Sandhya Sawwalakhe, Congress.Sarkarnama

Maharashtra Pradesh Congress News : नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षात हाय व्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे अपक्ष म्हणून निवडून आले. आमदार झाल्यावर त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तोफ डागली. तेव्हापासून कॉंग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

या वादानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विरोधात काही नेत्यांनी जोरदार मोहीम उघडली आहे. यासंदर्भात महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांना विचारणा केली असता, अंतर्गत कुरकुर सर्वच राजकीय पक्षांमध्ये असते. त्याची फार काळजी करण्याची कारण नाही. नाशिकवरून सुरू झालेला वाद लवकरच निकाली निघेल. पक्षश्रेष्ठी त्यावर लवकरच तोडगा काढतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

हृदय नसलेल्या अर्थमंत्री..

ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, त्या राज्यांत महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातही महिलांवर अन्याय झालेला आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, युवकांचे प्रश्‍न, शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच आहेत. देशाचा विकास होत नसून देशाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. एक महिला देशाची अर्थमंत्री असूनही महिलांवर अन्याय झाला असल्याचे संध्या सव्वालाखे म्हणाल्या.

बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा व सत्यजित तांबे यांच्या बाबतीत घडलेला प्रकार बघता सध्या काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण सुरू आहे का, या प्रश्‍नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, सर्वच पक्षात अंतर्गत कुरकुर सुरू असते, परंतु काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण नाही. हा प्रश्‍नही निकाली निघेल. त्या पुढे म्हणाल्या की, अर्थसंकल्पात महिलांवर अन्याय झाला आहे. महागाई वाढत आहे. देशाची अर्थमंत्री एक महिला असताना महिलांवर अन्याय होत आहे.

Sandhya Sawwalakhe, Congress.
Congress : भारत जोडोनंतर काॅंग्रेस रस्त्यावर ; खड्ड्यांच्या विरोधात गांधीगिरी करत आंदोलन

हृदय नसलेल्या अर्थमंत्री अशा शब्दात त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांचा उल्लेख केला. ’भारत जोडो यात्रे’चे यश हे अभूतपूर्व आहे. भारत जोडो यात्रेसोबतच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याही नावाची नोंद इतिहासाला घ्यावी लागणार आहे.

अदाणी प्रकरणाचा उल्लेख करीत देश विकासाकडे जात नसून देशाचे अस्तित्वच धोक्यात असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांची बदनामी विरोधक करीत आहेत. परंतु, महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्यानंतर कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा पूर्ण करून राहुल गांधी यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे, असेही संध्या सव्वालाखे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com