कॉंग्रेसला पाठिंबा देणारी नगरसेविका भाजपच्या गोटात; आमदार सुभाष धोटेंना पुन्हा धक्का !

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपिपरी नगरपंचायतीत सात कॉंग्रेस चार, भाजप (BJP) दोन, शिवसेना (Sivsena) दोन, राष्ट्रवादी (NCP) दोन अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. कॉंग्रेसने दोन अपक्ष व दोन शिवसेनेच्या नगरसेवकांना सोबत घेत सत्ता बसविली.
Chandrapur
ChandrapurSarkarnama

गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर) : नगरपंचायत निवडणुकीनंतर अपक्ष निवडून आलेल्या शारदा गरपल्लीवार यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेऊन पाठिंबा दिला. नगरपंचायतीत सत्ता स्थापन झाली. आता गरपल्लीवार यांनी आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्यासह अपक्ष आणि इतर नगरसेवकांच्या पाठिंब्याने गोंडपिपरीत सत्ताबदलाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपिपरी नगरपंचायतीत सात कॉंग्रेस चार, भाजप (BJP) दोन, शिवसेना (Sivsena) दोन, राष्ट्रवादी (NCP) दोन अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. कॉंग्रेसने दोन अपक्ष व दोन शिवसेनेच्या नगरसेवकांना सोबत घेत सत्ता बसविली. कॉंग्रेसच्या सविता कुळमेथे नगराध्यक्ष झाल्या तर सेनेच्या सारिका मडावी यांना उपनगराध्यक्षपद मिळाले. सत्ता स्थापन करतानाच अपक्ष नगरसेविका शारदा खेमदेव गरपल्लीवार यांनी कॉंग्रेसला (Congress) पाठिंबा देत पक्षात प्रवेश घेतला. दरम्यान सत्तास्थापनेनंतर नगराध्यक्ष मनमानी करीत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडूनच होत आला आहे. याचवेळी नगराध्यक्षांच्या विरोधात तक्रारीही केल्या गेल्या. याचदरम्यान कॉंग्रेसच्या सत्तेतील नगरसेविका शारदा गरपल्लीवार व त्यांचे पती खेमदेव गरपल्लीवार यांनी काल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला.

एकापाठोपाठ एक कार्यकर्ते कॉंग्रेस पक्ष सोडत असताना आज सत्तापक्षातील नगरसेविकेने थेट भाजपात प्रवेश घेत आमदार सुभाष धोटे यांना धक्का दिला आहे. गोंडपिपरीच्या विकासाला बळकटी मिळावी, यासाठी प्रवेश घेतल्याचे गरपल्लीवार दाम्पत्य सांगत आहे. येत्या काळात अपक्ष व सत्तापक्षातील सहकाऱ्यांना फोडून गोंडपिपरी नगरपंचायतीच्या राजकारणात शिंदे पॅटर्न राबविण्याची खेळी असल्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नगरसेविका शारदा गरपल्लीवार यांचे पती खेमदेव गरपल्लीवार हे गोंडपिपरी ग्रामपंचायतीच्या राजकारणातील किंगमेकर ठरले होते. अशात आता गरपल्लीवारांनी पक्ष बदलविल्याने येत्या काळातील नगरपंचायतीचे राजकारण कोणते वळण घेते हे बघणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नगरसेविका शारदा गरपल्लीवार, खेमदेव गरपल्लीवार यांचा भाजपात प्रवेश झाला. यावेळी अमर बोडलावार, दीपक सातपूते, चेतनसिंह गौर, पोचमल्लू उलेंदला, राहूल चौधरी, स्वप्निल बोनगीरवार यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Chandrapur
संभाजीराजेंच्या 'स्वराज्य'चा ग्रामपंचायत निवडणुकीत श्रीगणेशा; मिळवला पहिला विजय

गोंडपिपरी नगराचा विकास करण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसचे प्रयत्न अपुरे ठरले आहेत.आमदार धोटे हे ठरावीक कार्यकर्त्यांना महत्व देत असल्याने पक्षात असंतुष्टता आहे. जुन्या कार्यकर्त्यांनी धोटेंना घरचा अहेर दिला आहे. विकासाच्या दृष्टीने आम्ही आज भाजपात प्रवेश घेतला आहे.

खेमदेव गरपल्लीवार, गोंडपिपरी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com